The Great Indian Kapil Show : 'आलियाने लग्न केलं, कियाराने लग्न केलं, आता तू कधी लग्न करतेय?', कपिल शर्माच्या प्रश्नावर सोनाक्षी सिन्हाचं भन्नाट उत्तर

Sonakshi Sinha In The Great Indian Kapil Show : कपिल शर्माने सोनाक्षी सिन्हाला तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलेल्या उत्तराची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
Sonakshi Sinha In The Great Indian Kapil Show
Sonakshi Sinha In The Great Indian Kapil ShowInstagram

सोशल मीडियावर ‘हिरामंडी- द डायमंड बझार’ वेबसीरीजची जोरदार चर्चा सुरू आहे. ही वेबसीरीज १ मे रोजी ‘नेटफ्लिक्स’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेली आहे. सध्या ह्या चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यग्र असलेली दिसत आहे. नुकतंच ह्या वेबसीरीजच्या टीमने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी कपिल शर्माने सोनाक्षी सिन्हाला तिच्या लग्नाबद्दल एक प्रश्न विचारला आहे. या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलेल्या उत्तराची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

Sonakshi Sinha In The Great Indian Kapil Show
Agni Film : "अग्नी" चित्रपटात मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्रीही साकारणार प्रमुख भूमिका

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा प्रोमोमध्ये सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. प्रोमोमध्ये, कपिल शर्माने 'हीरामंडी'च्या कलाकारांसमोर सोनाक्षी सिन्हाला प्रश्न विचारतो की, 'आलियाने लग्न केलं, कियाराने लग्न केलं, आता तू कधी लग्न करतेय?' कपिलच्या ह्या प्रश्नावर सोनाक्षी सिन्हा म्हणते, "तू जखमेवर मीठ चोळतोय का ?" पुढे सोनाक्षी म्हणते, "त्याला माहित आहे, मला किती धुमधडाक्यात लग्न करायचे आहे." सोनाक्षी सिन्हाच्या या उत्तरावर कपिल शर्मा जोरजोरात हसायला लागतो.

अवघ्या काही तासांपूर्वीच हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. प्रेक्षक ह्या एपिसोडसाठी उत्सुक असून सर्वच चाहत्यांकडून सर्वच कलाकारांचे कौतुक केले जात आहे. सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून ८२ हजारांहून अधिक चाहत्यांनी ह्या प्रोमोला लाईक्स केले आहेत. 'हीरामंडी' या वेबसीरीजमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, आदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, अध्यायन सुमन, शेखर सुमन, फरदीन खान, संजीदा शेख आणि ताहा शाह बदुशा प्रमुख भूमिकेत आहे.

Sonakshi Sinha In The Great Indian Kapil Show
Gaurav More Quit MHJ Show : 'सांगताना खूप वाईट वाटतंय की मी...'; गौरव मोरेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडली

'हीरमंडी : डायमंड बझार' ही सीरिज १ मे रोजी ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे. या वेबसीरिजच्या माध्यमातून दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ओटीटीविश्वात पदार्पण केले आहे. नेटफ्लिक्सवरील ही अत्यंत महागड्या वेबसीरिजपैकी एक वेबसीरीज असल्याचं बोललं जात आहे.

Sonakshi Sinha In The Great Indian Kapil Show
Kangana Ranaut : अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर कंगना झाली ट्रोल, नेटकऱ्यांनी खिल्ली उडवत चांगलंच सुनावलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com