Raj Babbar Career Facebook
मनोरंजन बातम्या

Raj Babbar Birthday : अभिनयातच नाही तर राजकारणातही हिट, वैयक्तिक आयुष्यामुळे राज बब्बर राहिलेत चर्चेत

Raj Babbar Career : बॉलिवूड चित्रपटापासून राजकारणापर्यंत आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर वेगळे स्थान मिळविणाऱ्या राज बब्बर यांचा आज ७२ वा वाढदिवस आहे. अभिनयात माहीर असलेले राज बब्बर काही काळाने राजकारणातही सक्रिय झाले.

Chetan Bodke

बॉलिवूड चित्रपटापासून राजकारणापर्यंत आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर वेगळे स्थान मिळविणाऱ्या राज बब्बर यांचा आज वाढदिवस. २३ जून १९५२ रोजी उत्तर प्रदेशातील तुंडला येथे जन्मलेल्या राज बब्बर यांचा आज ७२ वा वाढदिवस आहे. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर राज यांनी ८० च्या दशकात सिनेविश्वावर राज्य केले आहे. पथनाट्य आणि रंगभूमीपासून राज यांनी आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली. अभिनयात माहीर असलेले राज बब्बर काही काळाने राजकारणातही सक्रिय झाले.

देशातल्या राजकारणामध्ये राज बब्बर हे नाव कमालीचं चर्चेतलं आहे. त्यांनी १९८९ मध्ये जनता दल पक्षातून राजकारणात एन्ट्री मारली. १९९४ ते १९९९ या काळात राज बब्बर राज्यसभेचे खासदार म्हणून राहिले होते. अलीकडेच त्यांनी गुरुग्राम लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली, ज्यात त्यांचा पराभव झाला होता.

२०१४ मध्येही राज यांनी गाझियाबादमधून निवडणूक लढवली होती. तेव्हाही त्यांचा पराभव झाला होता. राज बब्बर हे यूपी काँग्रेसचे अध्यक्षही राहिले आहेत. २००९ मध्ये फिरोजाबाद मतदारसंघातून सपाच्या तिकिटावर ते लोकसभा निवडणूक जिंकले.

२००९ मध्ये त्यांनी फिरोजाबाद जागेवर झालेल्या निवडणुकीत डिंपल यादव यांचा पराभव केला होता. मात्र, दोन वर्षांनंतर त्यांची सपा पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

१९७७ मध्ये रिलीज झालेल्या 'किस्सा कुर्सी का' चित्रपटातून राज बब्बर यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. एनएसडीमधून शिक्षण घेतलेल्या राज यांचे 'इन्साफ का तराजू'मध्ये आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मनं जिंकली. 'निकाह' चित्रपटातील सलमा आगा आणि 'आज की आवाज'मधील त्यांच्या आणि स्मिता पाटील यांच्या लव्ह केमिस्ट्रीची तुफान चर्चा झाली. राज बब्बर यांनी पहिले लग्न १९७५ मध्ये नादिरासोबत तर दुसरे लग्न १९८३ मध्ये स्मिता पाटील यांच्यासोबत केले होते. १९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'भीगी पालकी' चित्रपटाच्या शुटिंगवेळी राज बब्बर यांची स्मिता पाटील यांच्याशी भेट झाली. समाजाची पर्वा न करता त्यांनी स्मिता पाटील यांच्यासोबत दुसरे लग्न केले.

राज बब्बर आणि स्मिता पाटील यांना आर्य बब्बर, जुही बब्बर आणि प्रतीक बब्बर अशी तीन मुले आहेत. १९८६ मध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर अवघ्या १५ दिवसांनी स्मिता पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूमुळे राज बब्बर फारच खचले आणि परत ते पहिली पत्नी नादिराकडे गेले. राज यांनी आपल्या सिनेकरियरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली. त्यातील त्यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plane Crash: उड्डाण घेताच काही सेकंदात विमान कोसळलं, उडाला मोठा भडका; परिसरात काळेकुट्ट धुरांचे लोट; अपघाताचा थराराक VIDEO

Wardha News : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; तरुणाकडून प्रवाशावर ब्लेडने सपासप वार

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक

SCROLL FOR NEXT