CCTV Footage : शाळेच्या मैदानात खेळता-खेळता चिमुकल्याला मृत्यूने कवटाळलं; हृदयद्रावक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Firozabad News : त्याच भागातील हंस वाहिनी शाळेमध्ये त्याचे शिक्षण सुरू होते. शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास मधीलसुट्टी झाली होती. त्यामुळे सर्व मुले शाळेच्या मैदनात खेळायला गेले होते.
CCTV Footage
CCTV FootageSaam TV

Uttar Pradesh :

उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद येथे इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्याचा खेळताना अचानक मृत्यू झालाय. चंद्रकांत असे या मुलाचे नाव असून तो अवघ्या ८ वर्षांचा होता. या चिमुकल्याचा मृत्यू नेमका कसा झाला ही संपूर्ण घटना समोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सदर घटनेमुळे संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

CCTV Footage
Uttar Pradesh News: पोलीस भरती पेपरफुटी प्रकरणी योगी सरकारची मोठी कारवाई, 391 आरोपींना अटक

शनिवारी दुपारी १२ वाजता ही घटना घडलीये. यावेळी चंद्रकांत शाळेतील मित्रांसह खेळत होता. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला असावा असं म्हटलं जातंय. मात्र मृत्यूचं खरं कारण अद्याप समजलं नाहीये.

उत्तर प्रदेशमधील फिरोजाबादमध्ये ही घटना घडली आहे. फिरोजाबादमधील हिमायुंपूर या भागात ८ वर्षीय चंद्रकात त्याच्या कुटुंबीयांसह राहत होता. त्याच भागातील हंस वाहिनी शाळेमध्ये त्याचे शिक्षण सुरू होते. शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास मधीलसुट्टी झाली होती. त्यामुळे सर्व मुले शाळेच्या मैदनात खेळायला गेले होते.

चंद्रकांत सुद्धा त्याच्यासोबत खेळामध्ये मग्न झाला होता. पण अचानक खेळता खेळता तो खाली कोसळला. चंद्रकांत खाली पडल्यामुळे आजुबाजुच्या विद्यार्थ्यांनी त्याला उठवण्याचा खुप प्रयत्न केला पण त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षकांना या सर्व घटनेची माहिती दिली. त्यानंतर सर्वांनी चंद्रकांतला शाळेच्या जवळील रुग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी चंद्रकांतची तपासणी केली असता त्याला मृत घोषित केले.

शाळेच्या अधिका-यांनी तातडीनं चंद्रकांतच्या कुटुंबाला माहिती दिली. चंद्रकांतच्या कुटुंबीयांवर दुख:चा दोंगर कोसळला आहे. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी चंद्रकांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. पोलासांनी तपास सुरु केला असून मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर मृत्यूचे खरं कारण स्पष्ट होईल अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.

CCTV Footage
School Timing Changed : शाळा सकाळच्या सत्रात भरवा; उन्हाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाचा आदेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com