School Timing Changed : शाळा सकाळच्या सत्रात भरवा; उन्हाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाचा आदेश

शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी छत्रपती संभाजीनगर , बीड, परभणी, हिंगाेली आणि जालना या जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरवाव्यात अशी मागणी केली हाेती.
change school timings of marathwada demands mla vikram kale
change school timings of marathwada demands mla vikram kalesaam tv

- रामनाथ ढाकणे

Chhatrapati Sambhajinagar News :

येत्या एक मार्चपासून सर्व माध्यमांच्या शाळा सकाळच्या सत्रात भरवाव्यात असा आदेश सर्व शाळांना शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून प्राप्त झाला आहे. त्यानूसार उद्यापासून (शुक्रवार, ता. एक मार्च) राज्यातील पाच जिल्ह्यात याची अंमलबजावणी हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra News)

सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्याबरोबरच बारावीची परीक्षा (HSC Exam 2024) सुरू आहेत. एक मार्चपासून दहावीची परीक्षा (SCC Exam 2024) सुरू होत आहेत. त्यामुळे एक मार्चपासून विभागातील सर्व माध्यमांच्या शाळा या सकाळच्या सत्रात भरवाव्यात असा आदेश सर्व शाळांना शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून प्राप्त झाला आहे.

change school timings of marathwada demands mla vikram kale
Dwarkadas Mantri Nagari Sahakari Bank : द्वारकादास मंत्री बँकेचे निर्बंध आरबीआयने उठवले : डाॅ. आदित्य सारडा

मराठवाड्यामध्ये सध्या उन्हाची तीव्रता वाढलेली प्रचंड पाणीटंचाई जाणवायला देखील सुरुवात झाली आहे. विभागातील जवळपास 30 ते 40 टक्के शाळा या पत्राच्या शेड मध्ये भरत असल्याने विद्यार्थ्यांना पत्रामुळे उन्हाचा प्रचंड त्रास होतो. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना आरोग्याची समस्या उद्भवू नये यासाठी शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा आदेश पारित करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिक्षक आमदार विक्रम काळे (mla vikram kale) यांनी छत्रपती संभाजीनगर , बीड, परभणी, हिंगाेली आणि जालना या जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरवाव्यात अशी मागणी केली हाेती. त्या अनुषंगाने शिक्षण उपसंचालक कार्यालयाने आदेश काढला आहे.

Edited By : Siddharth Latkar

change school timings of marathwada demands mla vikram kale
Kolhapur : बंद करा...बंद करा...कत्तलखाना कायमस्वरुपी बंद करा..., इचलकरंजी शहरात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com