Dwarkadas Mantri Nagari Sahakari Bank : द्वारकादास मंत्री बँकेचे निर्बंध आरबीआयने उठवले : डाॅ. आदित्य सारडा

द्वारकादास मंत्री बँकेवरील निर्बंध हटल्यानंतर डाॅ. आदित्य सारडा यांनी ठेवीदार आणि खातेदारांच्या विश्वासासह पारदर्शक कारभाराची पावती मिळाल्याचे भावना व्यक्त केली
rbi lifted restrictions of dwarkadas mantri bank beed
rbi lifted restrictions of dwarkadas mantri bank beed saam tv
Published On

Beed News :

बीड जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील नामांकित द्वारकादास मंत्री बँकेवर (Dwarkadas Mantri Nagari Sahakari Bank Ltd, Beed) सन 2022 कालावधीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) लावलेले निर्बंध आता पूर्णपणे हटविण्यात आले आहेत. याबाबतची माहिती द्वारकादास मंत्री बँकेचे अध्यक्ष डॉ. आदित्य सुभाषचंद्र सारडा (dr. aditya sarda) यांनी माध्यमांना दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

9 मार्च 2022 रोजी द्वारकादास मंत्री बँके बाबतच्या तक्रारी झाल्याने आरबीआयने सर्व प्रकारचे निर्बंध लावले होते. त्यानंतर जुने संचालक मंडळ कमी करून बँकेवर प्रशासक नियुक्त केले. 21 ऑक्टोबर 2022 रोजी बँकेचा परवाना रद्द करण्यासाठी नोटीस देण्यात आली होती. (Maharashtra News)

rbi lifted restrictions of dwarkadas mantri bank beed
Sushma Andhare : ...तर भाजपनं गौतमी पाटीलला उमेदवारी द्यावी, सुषमा अंधारेंची काेपरखळी (VIDEO)

आरबीआयने बॅंकेची आर्थिक स्थिती पाहून बॅंकेवरील निर्बंध हटविले आहेत. त्यामुळे हजारो ठेवीदारांनी सुटकेचा निश्वास सोडला असुन बँक पुन्हा पूर्वपदावर आली आहे. आगामी काळात बँक पुन्हा गतीने भरारी घेईल, असा विश्वास बँकेचे अध्यक्ष डॉ. आदित्य सारडा यांनी बीड येथे व्यक्त केला. निर्बंध हटवल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन ठेवीदार आणि खातेदारांच्या विश्वासासह पारदर्शक कारभाराची पावती मिळाल्याचे भावना त्यांनी व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

rbi lifted restrictions of dwarkadas mantri bank beed
Rashmi Bagal Joins BJP : शिवसेना नेत्या रश्मी बागल यांचा पक्षाला जय महाराष्ट्र, हाती घेतले कमळ (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com