Rashmi Bagal Joins BJP : शिवसेना नेत्या रश्मी बागल यांचा पक्षाला जय महाराष्ट्र, हाती घेतले कमळ (पाहा व्हिडिओ)

पुण्यात भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या एका कार्यक्रमात रश्मी बागल या व्यासपीठावर हाेत्या. तेव्हापासून बागल गट भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा हाेती.
karmala shivsena leader rashmi bagal joins bjp
karmala shivsena leader rashmi bagal joins bjpsaam tv
Published On

Pandharpur News :

लोकसभा निवडणुकीपूर्वी (lok sabha election 2024) सोलापूर जिल्ह्यात मोठ्या राजकीय घडमोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) गटाच्या करमाळा (karmala) येथील नेत्या रश्मी बागल (rashmi bagal) व दिग्विजय बागल यांनी शिंदे गटाला सोडून भाजपमध्ये (bjp) प्रवेश केला आहे. बागल यांच्या प्रवेशामुळे माढ्यात (madha lok sabha constituency) भाजपची ताकद आणखी वाढली आहे. (Maharashtra News)

रश्मी बागल या सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत करमाळा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार हाेत्या. त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला हाेता. त्यानंतरही त्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपले कार्य सुरु ठेवले हाेते.

karmala shivsena leader rashmi bagal joins bjp
Ajit Pawar vs Sharad Pawar : अजित पवार गटास खिंडार? मावळमध्ये पदाधिका-यांचे राजीनामा सत्र, जाणून घ्या कारण

पुण्यात भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या एका कार्यक्रमात रश्मी बागल या व्यासपीठावर हाेत्या. तेव्हापासून बागल गट भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा हाेती. मंगळवारी मराठवाड्यातील नेते बसवराज माधवराव पाटील (basavraj patil) तसेच करमाळा-माढा राजकारणातील एक प्रभावी नेतृत्त्व रश्मी कोलतै-बागल व दिग्विजय बागल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

बागल यांच्यावर भाजपा महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत रश्मी बागल यांनी नुकताच भाजपामध्ये (rashmi bagal joins bjp) प्रवेश केला. त्यानंतर त्यांची भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे बागल यांच्यावरील जबाबदारी आता वाढल्याची चर्चा त्यांच्या गाेटात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

karmala shivsena leader rashmi bagal joins bjp
Deepak Kesarkar : दीपक केसरकर यांच्या जिल्ह्यात विद्यार्थी शाळेच्या व्हरांड्यात बसून गिरवतोय अभ्यासाचे धडे, चर्चा तर हाेणारच !

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com