Ajit Pawar vs Sharad Pawar : अजित पवार गटास खिंडार? मावळमध्ये पदाधिका-यांचे राजीनामा सत्र, जाणून घ्या कारण

Maval Political News : तब्बल 25 वर्षांची भाजपाची सत्ता बाजूला करून मावळ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद तयार केली.
ajit pawar faction resignation in maval
ajit pawar faction resignation in mavalSaam Digital
Published On

Maval News :

संपूर्ण राज्यभर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (ncp leader ajit pawar) निवडणुकांसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची जमवा जमव करत आहे. दुसरीकडे मात्र मावळ तालुक्यात अजित पवारांचे कट्टर समर्थक आणि पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मुर्‍हे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने मावळ तालुक्यात चर्चेला उधाण आलेले आहे. (Maharashtra News)

अजित पवार गटातील मावळ तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पदांचा राजीनामा पक्षाकडे सुपूर्त करण्यास प्रारंभ केला आहे. ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांना पक्षीय पातळीवर दुय्यम स्थान दिले जात असल्याने नाराजीतून राजीनामा सत्र सुरु असल्याची चर्चा मावळ तालुक्यात सुरू आहे.

ajit pawar faction resignation in maval
Maratha Andolan : पाेलिस काेणाच्या दबावाखाली आहेत ? गुन्हा दाखल झाल्यानंतर लातूरमध्ये मराठा आंदाेलक भडकले

अजित पवारांनी दिलेल्या आदेशानंतर मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या पुढाकाराने मावळ तालुक्यात नाराज असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची नाराजी दूर करण्यात यश आले आहे. पदाधिकाऱ्यांचा पदाचा राजीनामा हा वरिष्ठ पातळीवर नामंजूर करण्यात आला आहे. परंतु गैरसमजातून काही घटना घडल्याने मावळ मधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अजित पवार गटाचा राजीनामा दिला होता.

ajit pawar faction resignation in maval
Chandur Railway Kharedi Vikri Sangh : चांदूर रेल्वे खरेदी विक्री सोसायटी अध्यक्षपदी गाेविंदारव देशमुख, उपाध्यक्षपदी पकंज शिंदे

येणाऱ्या काळात कोणत्याचा दुजाभाव कोणत्याही कार्यकर्ता अथवा पदाधिकारी यांच्याबाबत मावळ तालुक्यात होणार नाही. सर्व नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची नाराजी दूर झाली असून ते सर्व जण आता मावळ तालुक्यात अजित पवार गटाचेच काम करणार असल्याचे स्पष्टीकरण मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिले आहे.

तब्बल 25 वर्षांची भाजपाची सत्ता बाजूला करून मावळ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद तयार केली. मात्र अजित पवार स्वतंत्र झाल्यानंतर मावळ मधील एक गट अजित पवार यांच्याबरोबर तर उर्वरित गट हा शरद पवार (sharad pawar) यांच्याबरोबर गेला. त्यामुळेच अजित पवार गटाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अजित पवार गटाची ताकद कायम

मागील काही दिवसांपासून मावळ मध्ये सुरू असलेले राजीनामा नाट्य सुरू असल्याने शरद पवार गटाच्या आशा पल्लवित झाल्या आहे. मात्र अजित पवारांनी लक्ष देत तालुकाध्यक्ष यांना नाराजी दूर करण्यासाठी सांगितले. यात मावळचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यशस्वी झाले. त्यामुळे अजित पवार गटाची ताकद ही कायम राहिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

ajit pawar faction resignation in maval
Kolhapur : बंद करा...बंद करा...कत्तलखाना कायमस्वरुपी बंद करा..., इचलकरंजी शहरात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com