Deepak Kesarkar : दीपक केसरकर यांच्या जिल्ह्यात विद्यार्थी शाळेच्या व्हरांड्यात बसून गिरवतोय अभ्यासाचे धडे, चर्चा तर हाेणारच !

Devgad News : विद्यार्थ्यांचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. त्यानंतर गेल्या आठवड्यात संबंधित शिक्षिकेने शाळेत येत शाळेला कायम स्वरूपी कुलुप ठाेकले.
deput teachers in ganpatiwadi zilla parishad school demands students near sindhudurg
deput teachers in ganpatiwadi zilla parishad school demands students near sindhudurg saam tv
Published On

- विनायक वंजारे

Sindhudurg News :

शिक्षणमंत्री दीपक केसरकर (deepak kesarkar) यांच्या जिल्ह्यातच मुलांच्या शिक्षणाची परवड सुरु असल्याची धक्कादायक बाब समाेर आली आहे. जिल्हा परिषद शाळेला शिक्षकच उपलब्ध हाेत नसल्याने तसेच शाळेला कुलूप ठाेकल्याने विद्यार्थ्यांना व्हरांड्यात बसून शिक्षकांविना अभ्यास करावा लागत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

देवगड तालुक्यातील आरे गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरे गावात गणपतीवाडी ही पहिली ते चौथीपर्यंतची जिल्हा परिषद शाळा आहे. ही शाळा गेल्या दोन महिन्यापासून बंद करण्यात आली आहे.

deput teachers in ganpatiwadi zilla parishad school demands students near sindhudurg
Goa Crime News : गाेव्यात ज्येष्ठ नागरिकाचा खून, युवतीसह युवकाने नवी मुंबई पाेलिसांना दिली गुन्ह्याची कबुली

या शाळेतील शिक्षिकेला दुसर्‍या शाळेत कामगिरीसाठी पाठवण्यात आले आहे. यामुळे शाळेतील दोन पटसंख्या असलेल्या मुलांना शिक्षक नसल्यामुळे 'कोण शिक्षक देता का शिक्षक' अस म्हणण्याची वेळ आली आहे. (Maharashtra News)

गणपती वाडीतील शिक्षिकेला दुसर्‍या शाळेत पाठवण्यात आल्या नंतर त्या शिक्षिकेने इयत्ता चौथीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांकडे या शाळेची चावी दिली. हा विद्यार्थी दररोज शाळा उघडून एकटाच अभ्यास करत बसायचा. या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. त्यानंतर गेल्या आठवड्यात संबंधित शिक्षिकेने शाळेत येत शाळेला कायम स्वरूपी कुलुप ठाेकले.

deput teachers in ganpatiwadi zilla parishad school demands students near sindhudurg
Kolhapur : बंद करा...बंद करा...कत्तलखाना कायमस्वरुपी बंद करा..., इचलकरंजी शहरात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा

तेव्हा पासून विद्यार्थी शाळेच्या व्हरांड्यात बसून एकटाच अभ्यास करतो आहे. ही शाळा दुर्गम आणि जंगलमय भागात असूनही विद्यार्थी रोजच्या रोज शाळेच्या व्हरांड्यात बसून शिक्षकाविना अभ्यासाचे धडे गिरवत आहे.

शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच हा धक्कादायक प्रकार समोर आला असून या शाळेला शिक्षक देऊन मुलांच्या शिक्षणाची परवड दुर करण्याची मागणी होत आहे.

नजीकच्या शाळेत जा

दरम्यान या शाळेतील पटसंख्या कमी आहे. त्यामुळे नजीकच्या (दोन ते तीन किलोमीटर अंतर) दुसऱ्या गावातील शाळेत संबंधित मुलांना शाळेत जाण्यास शिक्षण विभागाने सूचित केल्याची माहिती मिळत आहे. परंतु जंगल भागातून पायपीट करत अन्य शाळेत जावं लागणार असल्याने विद्यार्थी व त्यांचे पालक भयभीत झालेत.

Edited By : Siddharth Latkar

deput teachers in ganpatiwadi zilla parishad school demands students near sindhudurg
Lok Sabha Election 2024 : नारायण राणे राजन साळवींचे चॅलेंज स्विकारतील ? (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com