TRP Ratings Of Marathi Serial : तेजश्री प्रधानच्या 'प्रेमाची गोष्ट'चा टीआरपी घसरला, 'ठरलं तर मग' आणि 'लक्ष्मीच्या पाऊलांनी'मध्ये चुरशीची लढत

Marathi Tv Serial : नुकताच मराठी मालिकेंची टीआरपी यादी जाहीर झालेली आहे. या यादीमध्ये 'प्रेमाची गोष्ट', 'ठरलं तर मग' आणि 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.
TRP Ratings Of Marathi Serial : तेजश्री प्रधानच्या 'प्रेमाची गोष्ट'चा टीआरपी घसरला, 'ठरलं तर मग' आणि 'लक्ष्मीच्या पाऊलांनी'मध्ये चुरशीची लढत
TRP Rating Of Marathi Tv SerialSaam Tv

टीव्हीवरील अनेक मालिका कायमच प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय असतात. यातील बऱ्याच मालिका प्रेक्षकांच्या आवडीचा विषय आहेत, तर काही विस्मरणात आहेत. मात्र प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या मालिका कायमच टीआरपीच्या शर्यतीमध्ये दमदार कामगिरी करताना दिसतात. टीआरपीच्या रेसमध्ये टिकून राहण्यासाठी निर्माते आणि लेखक कायमच मालिकेमध्ये वेगवेगळे ट्वीस्ट आणण्याचा प्रयत्न करीत असतात. दर आठवड्याला टीआरपी यादी जाहीर केली जाते. नुकतंच १ जून ते ०७ जून दरम्यानचा मालिकांची टीआरपी यादी समोर आलेली आहे.

TRP Ratings Of Marathi Serial : तेजश्री प्रधानच्या 'प्रेमाची गोष्ट'चा टीआरपी घसरला, 'ठरलं तर मग' आणि 'लक्ष्मीच्या पाऊलांनी'मध्ये चुरशीची लढत
Kanika Mann Weight : टीव्ही अभिनेत्रीचं वजन फक्त २५ किलो, नेटकऱ्यांच्या मनातही शंका

'मराठी टेलिबझ ऑफिशियल'या इन्स्टाग्राम चॅनलने नुकताच टीआरपी चार्ट शेअर केलेला आहे. शेअर केलेल्या यादीमध्ये, जुई गडकरी आणि अमित भानुशालीच्या 'ठरलं तर मग' मालिकेने बाजी मारलेली आहे. ह्या मालिकेला ६.८ इतके रेटिंग्स मिळाले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर ईशा केसकरची 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' ही सीरियल आहे. या मालिकेलाही अल्पावधीतच प्रेक्षकांकडून कामाची पोचपावती मिळालेली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळेची 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका आहे. या तीनही मालिकांमध्ये नेहमीच टीआरपीच्या शर्यतीत चुरस पाहायला मिळते.

 • टॉप १५ मध्ये कोणकोणत्या मालिकेंचा समावेश आहे ?

 1. ठरलं तर मग- ६.८

 2. लक्ष्मीच्या पाऊलांनी- ६.५

 3. प्रेमाची गोष्ट- ६.४

 4. तुझेच मी गीत गात आहे- ६.१

 5. घरोघरी मातीच्या चुली- ५.९

 6. येड लागलं प्रेमाचं- ५.३

 7. साधी माणसं- ४

 8. अबोली- ३.९

 9. मन धागा धागा जोडतो नवा- ३.१

 10. शुभ विवाह- ३

 11. सुख म्हणजे नक्की काय असतं- २.९

 12. पारू- २.८

या मालिकेंचा टीआरपी यादीमध्ये समावेश आहे.

TRP Ratings Of Marathi Serial : तेजश्री प्रधानच्या 'प्रेमाची गोष्ट'चा टीआरपी घसरला, 'ठरलं तर मग' आणि 'लक्ष्मीच्या पाऊलांनी'मध्ये चुरशीची लढत
Sonakshi Sinha Wedding : लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा धर्मांतरण करणार का?, नेटकऱ्यांच्या प्रश्नावर इकबालच्या वडिलांचं रोखठोक उत्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com