सोनाक्षी सिन्हा आणि इक्बाल जहीर यांच्या लग्नाच्या आधीच्या विधींना सुरूवात झालेली आहे. येत्या २३ जूनला हे कपल लग्नगाठ बांधणार असून संध्याकाळी त्यांची रिसेप्शन पार्टी असणार आहे. सोनाक्षी हिंदू आहे तर इक्बाल मुस्लिम आहे, त्यामुळे लग्न कोणत्या पद्धतीने केले जाणार ? याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. त्यासोबतच सोनाक्षी धर्मांतरण करणार का ? असा ही प्रश्न नेटकरी तिला विचारत आहेत. यासर्व चर्चांदरम्यान झहीरचे वडील रतनसी इक्बाल यांनी विधान केले आहे.
फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत झहीरचे वडील रतनसी इक्बाल यांनी सांगितले की, " सोनाक्षी धर्मांतरण करणार नाही, ही गोष्ट ठरलेली आहे. लग्न म्हणजे दोन्ही कुटुंबाचे मिलन असते. यामध्ये धर्माविषयी कोणतीही गोष्ट नाही. मी फक्त मानवतेवरच विश्वास ठेवतो. हिंदू लोकं देवाला भगवान म्हणतात, तर मुसलमान लोकं देवाला अल्लाह म्हणतात. पण शेवटी आपण सर्व माणसंच आहोत. माझा आशिर्वाद सदैव जहीर आणि सोनाक्षीच्या पाठीशी आहे."
लग्नाविषयी भाष्य करताना मुलाखतीत झहीरच्या वडीलांनी सांगितलं की, "सोनाक्षी आणि झहीरचं लग्न ना हिंदू पद्धतीने होणार नाही मुस्लिम पद्धतीने. हे लग्न कोर्टातून होणार आहे. कोर्ट मॅरेज केलं जाणार आहे." हिंदू- मुस्लीम कायद्यांतर्गत रजिस्टर मॅरेज झहीर इक्बालच्या घरी केलं जाणार आहे. झहीरच्या घरी सोनाक्षीची फॅमिली उपस्थिती लावणार आहे. रजिस्टर मॅरेजच्यानंतर संध्याकाळी मुंबईतच रिसेप्शन पार्टी होणार आहे.
सोनाक्षीने लग्नाविषयी आपल्या फॅमिली माहिती न दिल्यामुळे तिच्यावर तिची फॅमिली नाराज आहे. दरम्यान, सोनाक्षीच्या मुंबईतील घरी लग्नाच्या आधीच्या विधींना सुरूवात झालेली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुंबईतील 'रामायणा' बंगल्याला विद्युत रोषणाईन सजवण्यात आले आहे. काल रात्रीच सोनाक्षीला झहीरच्या नावाची मेहंदी लागली आहे. हे कपल उद्या सकाळी रजिस्टर मॅरेज करणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.