Tharla Tar Mag: सायली अर्जुनमधील कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपणार का? 'ठरलं तर मग' मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित

Tharla Tar Mag Serial Promo: 'ठरलं तर मग' ही मालिका लोकप्रिय आहे. घराघरात ही मालिका पाहिली जाते. मालिकेत नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.
Tharla Tar Mag
Tharla Tar MagSaam Tv

'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag)ही मालिका लोकप्रिय आहे. घराघरात ही मालिका पाहिली जाते. मालिकेत नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. मालिकेत सध्या अनेक गोष्टी घडत आहे. मालिकेत आता दोन दिवसांनी सायली-अर्जूनचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज (Sayali Arjun) संपणार आहे. त्यामुळे सायली अर्जुन दोघेही भावूक होताना दिसत आहे.

'ठरलं तर मग' मालिकेचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या नवीन प्रोमोमध्ये सायली अर्जुनच्या ऑफिसमध्ये डबा घेऊन आलेली दिसत आहे. सायली अर्जुनला म्हणते की, 'इथून पुढे डबा विसरुन येत जाऊन नका, दोन दिवसांनी मी नसेल आठवण करुन द्यायला'. यानंतर अर्जुनला पाणी पिताना ठसका लागतो. त्यानंतर सायली त्याच्या पाठीवरुन हात फिरवते आणि म्हणते, 'पाणी पिताना तुम्हाला सावकाश पिता येत नाही का? आता तुम्हाला सांभाळायला एक माणूस ठेवायचा का?' त्यावर अर्जुन म्हणतो, 'मग तुम्हीच राहा ना'. यानंतर सायली अर्जुन दोघेही भावूक होताना दिसत आहेत.

मालिकेच्या प्रोमोत महिपतबद्दल महत्त्वाची माहिती चैतन्यच्या हाती लागल्याचे दाखवण्यात आले आहे. अर्जुनच्या ऑफिसमध्ये चैतन्य येतो आणि म्हणतो की, 'महिपतबद्दल महत्त्वाची माहिती मला समजली आहे. जेलमध्ये महिपतकडे मोबाईल आहे. महिपत मधुभाऊबद्दल काहीतरी बोलत होते'. यानंतर सायली आणि अर्जुनला टेन्शन आल्याचे दिसत आहे.

Tharla Tar Mag
Shah Rukh Khan: काळा गॉगल, पांढरी दाढी अन् लांब केस, किंग खानचा धाकड लूक चर्चेत; नव्या चित्रपटाच्या सेटवरील फोटो लीक?

सायली अर्जुनचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपायला अवघे दोन दिवस उरले आहेत. सायली अर्जुनचे एकमेंकावर खूप प्रेम आहे. परंतु या दोघांच्या मनात अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. त्यामुळे सायली अर्जुनचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपणार का? कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपण्याआधी सायली अर्जुन प्रेमाची कबुली देणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत.

Tharla Tar Mag
Kartiki Gaikwad: 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम कार्तिकी गायकवाड झाली आई; सोशल मीडियावर शेअर केली गूड न्यूज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com