MPSC Result: कृषी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर; महिला प्रवर्गातून कोल्हापूरची सायली आली पहिली

MPSC Agriculture Service Examination Result: महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ही परीक्षा घेण्यात येत असते.
MPSC Exam
MPSC Exam Saam Tv

महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य (MPSC Agriculture Service Examination Result) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ही परीक्षा घेण्यात (MPSC Result)येत असते. एमपीएससीच्या वतीने कृषी सेवा परीक्षेच्या २०० जागांसाठी जाहीरात करण्यात आली होती. मागील वर्षी मे महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यात परीक्षेच्या मुलाखतीचा राउंड पार पडला. त्यानंतर आता ९ मे २०२४ रोजी परिक्षेचा निकाल लागला आहे. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.

महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील उंदररवाडी येथील सायली साताप्पा फासके यांचा महिला प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांत आला आहे. सायली फासके ही अत्यंत हुशार आणि मेहनती मुलगी आहे. सायली यांचे वडील प्राथमिक शाळेत शिक्षक आहे, तर आई गृहिणी आहेत. उंदरवाडीतील प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत तिने शालेय शिक्षण पूर्ण केले. तर प. बा. पाटील हायस्कूल मुदाळतिठ्ठा येथे हायस्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी बारावीनंतर बीएससी अॅग्रीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केला. याबाबत सकाळने वृत्त दिले आहे.

MPSC Exam
Bhendwal Bhavishyavani : भेंडवळची प्रसिद्ध भविष्यवाणी जाहीर; पाऊस आणि शेती पिकांबाबत केलं मोठं भाकित

सायली यांनी २०२० पासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. सायली यांनी सलग दोन वर्ष कृषी विभागाची परिक्षा दिली. त्यांना दुसऱ्या प्रयत्नात यश मिळाले आहे. आपल्या मुलीने आयुष्यात खूप मोठे व्हावे, स्वतः च्या पायावर उभी राहावी, अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. पुढील काळात सायलीला अधिकारी होण्याची इच्छा आहे, असे तिने स्वतः सांगितले.

MPSC Exam
Attack On ED W. Bengal: ईडीच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यामागे कोणाचा हात, कोण आहे संदेशखळीचा 'भाई'? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com