Attack On ED W. Bengal: ईडीच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यामागे कोणाचा हात, कोण आहे संदेशखळीचा 'भाई'? जाणून घ्या

Attack On ED W. Bengal News: संक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकावर शुक्रवारी छापेमारी सुरू असताना पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखळी येथे हल्ला करण्यात आला.
Attack On ED W. Bengal
Attack On ED W. BengalSaam Digital
Published On

Attack On ED W. Bengal

संक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकावर शुक्रवारी छापेमारी सुरू असताना पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखळी येथे हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर 'भाई' नावाने प्रसिद्ध असलेले टीएमसीचे स्थानिक नेते सहजाहान शेख चर्चेत असून ईडीवर झालेल्या हल्ल्यामागे त्यांचा हात असल्याचं मानलं जात आहे. दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यावरून प. बंगाल मधील राजकीय वातावरण तापलं असून विरोधी पक्षांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. राज्यपाल आनंद बोस यांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे.

जवळपास ८०० ते १००० जणांच्या जमावाने ईडीवर हल्ला केला असून अधिकाऱ्यांसह वाहनांना लक्ष करण्यात आलं आहे. या हल्ल्यात तीन अधिकारी जखमी झाले आहेत. यावेळी सीआरपीएफचे २७ जवान उपस्थित होते. संतप्त जमावाने अधिकाऱ्यांचे मोबाईल, लॅपटॉप, रोख रक्कम आणि पाकीटंही हिसकावण्यात आली. दरम्यान या हल्ल्याला तृणमूल कॉंग्रेसचे स्थानिक नेते शाहजहान शेख यांनी भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी जबाबदार धरलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Attack On ED W. Bengal
Indian Navy Rescue Hijacked Ship: भारतीय नौदलाची मोठी कामगिरी, अरबी समुद्रातून अपहरण करण्यात आलेल्या जहाजाची सुटका, जहाजावरील १५ भारतीय सुरक्षित

वीटभट्टी कामगार ते राजकारण

बांगलादेशच्या सीमेनजीक असलेल्या २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखळी ब्लॉकमध्ये शाहजहान शेख मासळी व्यवसायाशी संबंधीत होते. चार भावंडांमध्ये सर्वात मोठे असलेल्या शाहजहान यांनी मत्स्यशेती आणि वीटभट्यांमध्ये कामगार म्हणून देखील काम केलं आहे आणि याच व्यवसायाने त्यांना राजकारणात आणलं. २००४ मध्ये त्यांनी वीटभट्टी कामगारांचे नेते म्हणून राजकारणात प्रवेश केला. आता प. बंगालमधील मत्स्यव्यवसायातील शाहजहान एक मोठं नाव आहे. पं. बंगालमधील राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत होती. त्याला न जुमानता त्यांनी आपलं अस्तित्व कायम राखलं आणि २०१२ मध्ये तृणमूलच्या प्रमुख नेत्यांचं लक्ष वेधून घेतलं.

जिल्हाध्यक्ष ज्योतिप्रिया मल्लिक आणि तृणमूलचे तत्कालीन राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल रॉय यांच्या नेतृत्वात त्यांनी पक्ष प्रवेश केला. तृणमूल सत्तेत आल्यानंतर ते शक्तिशाली नेते बनले आणि मल्लिक यांचे जवळचे सरकारी बनले. सध्या ते संदेशखळी टीएमसी युनिटचे अध्यक्ष आहेत. मागच्या वर्षी जिल्हा परिषदेची जागा जिंकल्यानंतर तृणमूल काँग्रेसमधील त्यांचा राजकीय दर्जा आणखी वाढला. राजकीय आणि आर्थिक क्षेत्रावर त्यांचा प्रभाव आहे. या भागात त्यांची भाई म्हणून ओळख आहे. तर २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या मारहाणीशी त्यांचही नाव जोडलं गेलं होतं.

Attack On ED W. Bengal
Delhi Crime News: मामाच्या मुलाची तरुणीकडून जाळून हत्या; सततच्या त्रासाला कंटाळून तरुणीचं टोकाचं पाऊल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com