Indian Navy Rescue Hijacked Ship: भारतीय नौदलाची मोठी कामगिरी, अरबी समुद्रातून अपहरण करण्यात आलेल्या जहाजाची सुटका, जहाजावरील १५ भारतीय सुरक्षित

Indian Navy Rescue Hijacked Ship News: अरबीसमुद्रात एमव्ही लिली नॉरफोक या जहाचंच गुरुवारी सोमालीन चाच्यांकडून अपहरण करण्यात आलं होतं. या जहाजावर १५ भारतीयासह २१ जण होते. दरम्यान भारतीय नौदलाने या सोमालीन चाच्यांतावडीतून या जहाजाची आणि त्यावरील २१ जणांची सुखरूप सुटका केली आहे.
Indian Navy Rescue Hijacked Ship
Indian Navy Rescue Hijacked ShipSaam Digital
Published On

Indian Navy Rescue Hijacked Ship:

अरबीसमुद्रात 'एमव्ही लिली नॉरफोक' या जहाचंच गुरुवारी सोमालीन चाच्यांकडून अपहरण करण्यात आलं होतं. या जहाजावर १५ भारतीयासह २१ जण होते. दरम्यान भारतीय नौदलाने या सोमालीन चाच्यांतावडीतून या जहाजाची आणि त्यावरील २१ जणांची सुखरूप सुटका केली आहे. भारतीय नौदलाची आठवड्यातील ही दुसरी कारवाई आहे. काही दिवसांपूर्वी अरबी समुद्रात अमेरिकच्या जहाजाची भारतीय नौदलाने सुटका केली होती.

एमव्ही लिली नॉरफोक या जहाजाचं सोमालीयानजीक उत्तर अरबी समुद्रात अपहरण झालं होतं. भारतीय नौदलाला याची माहिती मिळताच तातडीन समुद्रारून आणि हवाईमार्गे कारवाईला सुरुवात केली. भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर जहाजापर्यंत पोहेचलं. त्यानंतर जहाजाची टेहळणी करण्यात आली. त्यानंतर नौदलाची जहाजापर्यंत पोहोचल्यानंतर चाच्यांनी गोळीबार केला आणि आडोशाला लपून बसले. नौदलाचे जवान जहाजावर पोहोचले तेव्हा चाच्यांनी तेथून पळ काढला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Indian Navy Rescue Hijacked Ship
Ram Mandir Ayodhya: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी दिग्गजांना निमंत्रण, राज्यातील ८८९ प्रतिष्ठित, साधू संत विशेष निमंत्रित

नौदलाच्या कमांडोंनी जहाजात प्रवेश केला आणि १५ भारतीयांसह २१ जणांची सुखरूप सुटका केली. दरम्यान नौदलाच्या अधिकाऱ्यांकडून अद्यापही जहाजाच्या तपासणीचे काम सुरू आहे. नौदलाचे प्रमुख आर. हरी कुमार यांनी अरबी समुद्रात तैनात असलेल्या नौदलाला समुद्र चाच्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Indian Navy Rescue Hijacked Ship
Delhi Crime News: मामाच्या मुलाची तरुणीकडून जाळून हत्या; सततच्या त्रासाला कंटाळून तरुणीचं टोकाचं पाऊल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com