अयोध्येत राम लल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या तयारीला उधाण आलंय. हा सोहळा 'याचि देही, याचि डोळा' पाहण्यासाठी देशा-विदेशातून भाविक हजेरी लावत आहेत. यासाठी २२ जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशा विदेशातील अनेक प्रतिष्ठितांना निमंत्रित करण्यात आलंय. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त प्रतिष्ठित आणि साधू-संत या सोहळ्यासाठी निमंत्रित आहेत. (Latest Ram Mandir News)
एकूण ८८९ प्रतिष्ठित हजेरी लावणार आहेत. यामध्ये उद्योग, क्रीडा, कला तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त ५३४ विशेष निमंत्रित २२ तारखेच्या अयोध्येतील सोहळ्याला उपस्थित राहतील. तर राज्यातील ३५५ साधू -संतांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला निमंत्रित करण्यात आलंय, असं विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र- गोवा प्रांताचे मंत्री गोविंद शेंडे यांनी म्हटलं आहे.
विभागवार निमंत्रितांची संख्या
राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून विभागवार किती प्रतिष्ठित, संत सोहळ्याला राहणार उपस्थित राहणार आहेत, ते आपण जाणून घेवू या. या कार्यक्रमासाठी राज्यातील एकूण विशेष निमंत्रित प्रतिष्ठित ५३४ आहेत. यात कोकण विभागातील ३९७ निमंत्रित आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ८४, मराठवाड्यातील १७, विदर्भातील ३६ निमंत्रित आहे.
महाराष्ट्रातील एकू्ण ३५५ साधू संतांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलंय. कोकणातून ७४, पश्चिम महाराष्ट्रातून १२४, मराठवाड्यातून (देवगिरी) ८० तर विदर्भातून ७७ साधू संत निमंत्रित आहेत.
अयोध्येत असणार अन्नछत्र
विश्व हिंदू परिषदेकडून अयोध्येत येणाऱ्या भाविकांसाठी अन्नछत्रांचं आयोजन करण्यात आलंय. १५ जानेवारी ते १५ डिसेंबरपर्यंत दररोज साधारण १० हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलीय. या सोहळ्याची सर्वच रामभक्त आतुरतेनं वाट पाहत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.