Tharla Tar Mag Serial Promo
Tharla Tar Mag Serial PromoSaam Tv

Tharla Tar Mag: सायली अर्जुन खरे नवरा- बायको नाहीत...; चैतन्यने सांगितलं साक्षीला सत्य

Tharla Tar Mag Serial Promo: मराठी मालिकांमधील 'ठरलं तर मग' ही लोकप्रिय मालिका आहे. मालिकेतील सायली अर्जुनची जोडी चाहत्यांना खूप जास्त आवडते. मालिकेत अनेक नवीन ट्विस्ट आले आहेत. मालिकेत आता सायली- अर्जुन खरे नवरा बायको नसल्याचे सत्य चैतन्य साक्षीला सांगणार आहे.
Published on

मराठी मालिकांमधील 'ठरलं तर मग' ही लोकप्रिय मालिका आहे. मालिकेतील सायली अर्जुनची जोडी चाहत्यांना खूप जास्त आवडते. मालिकेत अनेक नवीन ट्विस्ट आले आहेत. मालिकेत आता सायली- अर्जुन खरे नवरा बायको नसल्याचे सत्य चैतन्य साक्षीला सांगणार आहे.

ठरलं तर मग मालिकेचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोत साक्षी चैतन्यला म्हणते की, 'सायली अर्जुन दोघं मेड फॉर इच अदर कपल आहे'. त्यावर चैतन्य चिडून म्हणतो की, 'ते दोघं खरे नवरा बायको तरी आहेत का? त्या दोघांनी एकमेकांच्या सोयीसाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे'. यानंतर अर्जुन आणि सायलीमधील संभाषण दाखवले आहे. अर्जुन सायलीला म्हणतो की, 'मी आतापर्यंत असे गुन्हेगार पाहिलेत की जे आपण केलेल्या गुन्ह्यांचे पुरावे नष्ट करत नाही, या पुराव्यांना पाहिल्यावर त्यांना प्रेरणा मिळते'. त्यावर सायली म्हणते, 'जर साक्षीनेदेखील असंच केलं असेल'.

'ठरलं तर मग' मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. चैतन्य आणि अर्जुन एकमेकांशी बोलत नाही आहेत. तसेच साक्षीचा आणि अर्जुनच्या कॉलेजमधील मित्राचा काहीतरी संबंध आहे. त्यानंतर आता चैतन्य आणि साक्षी साखरपुडा करणार आहेत. यामुळे मालिकेत पुढे काय घडणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

Tharla Tar Mag Serial Promo
Aarti Singh Wedding: गोविंदा-कृष्णा अभिषेक यांच्यातलं भांडण मिटलं? कश्मिरा पाया पडली, माफी मागितली

मालिकेचा हा नवीन प्रोमो उत्सुकता वाढवणारा आहे. चैतन्यने सायलीला सर्व सत्य सांगितले आहे. त्यामुळे आता सायली अर्जुनच्या नात्याचे सत्य कुटुंबियांना कळणार का? सायली अर्जुनचे नाते खोट आहे, याचा साक्षी कसा वापर करणार? सायली अर्जुन साक्षीचे सत्य बाहेर काढण्यात यशस्वी होणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहे.

Tharla Tar Mag Serial Promo
Gurucharan Singh: 'गुरुचरणची तब्येत ठीक नसायची, जास्त खात नव्हता'; सोढी बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या जवळच्या मैत्रिणीने बरंच काही सांगितलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com