Aarti Singh Wedding: गोविंदा-कृष्णा अभिषेक यांच्यातलं भांडण मिटलं? कश्मिरा पाया पडली, माफी मागितली

Govinda attend Aarti Singh Wedding: बॉलिवूड अभिनेत्री आरती सिंहने २५ एप्रिलला दिपक चौहानशी लग्नगाठ बांधली आहे. या लग्नाची सर्वत्र चर्चा होत आहे. या लग्नात आरती सिंहचा मामा म्हणजे गोविंदा हजेरी लावणार की नाही याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती.
Aarti Singh Wedding
Aarti Singh WeddingSaam Tv

बॉलिवूड अभिनेत्री आरती सिंहने २५ एप्रिलला दिपक चौहानशी लग्नगाठ बांधली आहे. या लग्नाची सर्वत्र चर्चा होत आहे. या लग्नात आरती सिंहचा मामा म्हणजे गोविंदा हजेरी लावणार की नाही याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. दरम्यान भाची आरतीच्या लग्नात गोविंदा यांनी हजेरी लावली होती. याचेच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आरतीचा भाऊ कृष्णा अभिषेक आणि गोविंदा यांच्यातील वाद हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे भाचीच्या लग्नाला गोविंदा हजेरी लावणार की नाही याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, आता गोविंदाने लग्नाला हजेरी लावली आहे. गोविंदांनी भाची आरतीला लग्नासाठी शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले आहेत. गोविंदा यांनी लग्नात हजेरी लावली त्यामुळे आता अभिषेक आणि त्यांच्यातील भांडण मिटलं असल्याचे म्हटले जात आहे.

काही वर्षांपासून कृष्णाची पत्नी कश्मीरा आणि गोविंदाची पत्नी सुनीता यांच्या वाद झाले होते. परंतु आता हे वाद संपले असल्याचे बोलले जात होते. आरतीच्या लग्नाआधी कश्मीराने सांगितवे होते की, गोविंदा लग्नाला आल्यावर मी त्यांच्या पाया पडेन. कश्मीराने खरंच गोविंदाच्या पाया पडून माफी मागितली आहे.

Aarti Singh Wedding
Gurucharan Singh: 'गुरुचरणची तब्येत ठीक नसायची, जास्त खात नव्हता'; सोढी बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या जवळच्या मैत्रिणीने बरंच काही सांगितलं

कश्मीराने नुकतीच टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली आहे. गोविंदाने आरतीच्या लग्नाला हजेरी लावल्याबद्दल तिने आनंद व्यक्त केला आहे. कश्मीरा पाहुण्यांचे स्वागत करत होती. तेव्हा गोविंदा लग्नाला आल्यावर तिने त्यांच्या पाया पडून नमस्कार केला. तिने सांगितले की, मी त्यांना स्टेजवर घेऊन गेले. त्यांच्या पाया पडत होते. तेव्हा त्यांनी मला थांबवलं आणि आशिर्वाद दिले. मी त्यांच्या पाया पडायला खाली वाकले. हीच माफी आहे.लग्नात कश्मीराने तिच्या मुलांची ओळख गोविंदाशी करुन दिली. त्यांनी मुलांना आशिर्वाद दिली होते.

Aarti Singh Wedding
Gold Gala 2024: करण जौहरच्या शिरपेचात मानाचा तुरा; Gold Legend अवॉर्डने होणार सन्मान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com