Taarak Mehta Ka Fame Gurucharan Singh
Taarak Mehta Ka Fame Gurucharan SinghSaam Tv

Gurucharan Singh: 'गुरुचरणची तब्येत ठीक नसायची, जास्त खात नव्हता'; सोढी बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या जवळच्या मैत्रिणीने बरंच काही सांगितलं

Taarak Mehta Ka Fame Gurucharan Singh: छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चश्मा'. मालिकेतील रोशन सिंग सोढी म्हणजे गुरुचरण सिंग बेपत्ता झाला आहे. गुरुचरण सिंगच्या वडिलांनी अभिनेता बेपत्ता असल्याची माहिती दिली होती.
Published on

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah). मालिकेतील रोशन सिंग सोढी म्हणजे गुरुचरण सिंग बेपत्ता झाला आहे. गुरुचरण सिंगच्या (Gurucharan Singh)वडिलांनी अभिनेता बेपत्ता असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पोलिस त्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच गुरुचरणच्या मैत्रिणीने त्याच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे.

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, गुरुचरणची मैत्रिण मिस सोनी यांनी सांगितले की, 'गुरुचरण सिंगचे पालक चिंतेत आहे. त्यांनी दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मी मुंबईत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता'. (Gurucharan singh missing case update)

'गुरुचरणची तब्येत गेल्या काही दिवसांपासून ठिक नव्हती. दिल्लीला जाण्यापूर्वी त्याचे ब्लड प्रेशर वाढलं होती.त्याच्या काही टेस्ट करण्यात आल्या होत्या. दिल्लीला जाण्यापूर्वी तो खात पण नव्हता. मी प्रार्थना करते की, तो बरा असेल आणि लवकर घरी परत येईल', असंही त्यांनी सांगितले.

मीडिया रिपोर्टनुसार, गुरुचरण २२ एप्रिलपासून बेपत्ता आहे. तो ११ तारखेला मुंबईला येणार होता. परंतु तो विमानात बसलाच नाही. त्या दिवसापासून तो बेपत्ता आहे. गुरुचरणच्या वडिलांनी दिल्ली पोलिसांत मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे.

Taarak Mehta Ka Fame Gurucharan Singh
Gold Gala 2024: करण जौहरच्या शिरपेचात मानाचा तुरा; Gold Legend अवॉर्डने होणार सन्मान

गुरुचरणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, गुरुचरण हा तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत फार पूर्वीपासून काम करत होता. या कार्यक्रमात तो सोढी हे पात्र साकारत होता. गुरुचरण बेपत्ता असल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Taarak Mehta Ka Fame Gurucharan Singh
Mahadev Betting App Case: महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरण: अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com