Crime News: आधी लव्ह मॅरेज मग दुसरं लग्न, अडथळा ठरणाऱ्या बायको आणि मुलाला संपवलं; आग्र्यात दुहेरी हत्याकांड

Husband Killed Wife And Child: उत्तरप्रदेशमध्ये दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने त्याच्या बायको आणि मुलाची हत्या करून मृतदेह कालव्यामध्ये फेकून दिल्याचं समोर आलं आहे.
Crime News
Crime NewsYandex

Agra Crime News

उत्तर प्रदेशातील आग्रा (Agra Crime) येथे एका व्यक्तीनं नाव बदलून आधी एका महिलेला फसवलं. नंतर तिच्याशी लग्न केले. लग्नानंतर वाद झाल्यानंतर पत्नी मुलासह माहेरी गेली. त्यानंतर पतीने दुसरं लग्न केलं. पहिल्या पत्नीला या घटनेची माहिती मिळताच ती नवऱ्याच्या घरी आली. त्यांचा काटा काढण्यासाठी नवऱ्याने बायको आणि त्याच्या अडीच वर्षाच्या मुलाची हत्या करून मृतदेह कालव्यामध्ये फेकून दिला. (Latest Crime News)

पोलिसांनी या मृत महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तर मुलाच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. याप्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी सुरू (Husband Killed Wife And Child) आहे. महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. आरोपीवर दुहेरी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आग्रा येथील फतेहपूर सिक्री भागात हे हत्याकांड घडलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी या हत्याकांडाचा खुलासा केला आहे. मृत महिला आग्र्याच्या बोदला वीट मार्केटमध्ये मजूर म्हणून काम करत होती. तिची तीन वर्षांपूर्वी त्याची सिकंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अर्सेना गावात राहणारा आरोपी ओमेंद्र उर्फ ​​आशिकशी भेट झाली होती. आरोपीने या महिलेची दिशाभूल करून तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. चुकीचं नाव सांगून तिच्याशी लग्न (Husband Killed Wife) केलं. लग्नानंतर या दोघांमध्ये वाद सुरू झाले. नेहमीच्या भांडणांना कंटाळून ही महिला दीड वर्षांपूर्वी आपल्या बाळासह आई-वडिलांच्या घरी गेली होती. ती माहेरी गेल्यानंतर तिच्या नवऱ्याने गावातच दुसरं लग्न केलं होतं.

जेव्हा पहिल्या पत्नीला नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळाली. तेव्हा तिने नवऱ्याला फोन केला. त्याने फोनवर बोलून तिला घरी परत येण्यास सांगितलं. सोमवारी ती महिला फिरोजाबाद जिल्ह्यातील टुंडला रेल्वे स्थानकावर पोहोचली. तेव्हा आरोपीने या दोघांना रिसीव्ह करून आपल्या दुचाकीवर बसवलं.

Crime News
Dhule Crime : धुळ्यातील कॅफेमध्ये चालायचा अश्लील प्रकार; जोडप्यासह कॅफे चालक पोलिसांच्या ताब्यात

आरोपीने सांगितलं की, तो बायको आणि मुलाला दुचाकीवरून भरतपूरला घेऊन जात होता. तिथे त्यांना भाड्याच्या घरात ठेवायचं होतं. बायको त्याच्याकडे गावात राहण्याचा हट्ट करत होती. या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण (Agra Crime News) झालं. मारामारीदरम्यान त्याचा मुलगा चालत्या बाईकवरून पडला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

मुलाच्या मृत्यूमुळे बायकोने एकच गोंधळ केला. रागाच्या भरात आरोपीन बायकोचा स्कार्फने गळा आवळून खून केला. दोघांचे मृतदेह फतेहपूर सिक्री भागात असलेल्या कालव्यामध्ये फेकून (Crime News) दिले. आरोपीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी महिलेचा मृतदेह कालव्यातून बाहेर काढला आहे. मुलाचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.

Crime News
UP Crime: क्रुरतेचा कळस! हुंड्यात फॉर्च्युनर अन् २१ लाख रुपये न दिल्याचा राग; सासरच्यांकडून सूनेची हत्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com