UP Crime: क्रुरतेचा कळस! हुंड्यात फॉर्च्युनर अन् २१ लाख रुपये न दिल्याचा राग; सासरच्यांकडून सूनेची हत्या

Crime News in Marathi: हुंड्याची मागणी पुर्ण न झाल्याने या तरुणीची सासरच्या मंडळींनी हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. मुलीच्या कुटुबियांच्या तक्रारीवरुन पती व सासऱ्याला अटक करण्यात आली आहे.
UP Crime News
UP Crime NewsSaam tv

Uttar Pradesh Crime News:

उत्तरप्रदेशच्या नोएडामध्ये एका विवाहित महिलेचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हुंड्याची मागणी पुर्ण न झाल्याने या तरुणीची सासरच्या मंडळींनी हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. मुलीच्या कुटुबियांच्या तक्रारीवरुन पती व सासऱ्याला अटक करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत मृत तरुणीचा भाऊ दिपकने दिलेल्या तक्रारीनुसार, दिल्लीतील रहिवासी असलेल्या करिश्माचा विवाह खेडा चौगनपूर येथील विकास याच्याशी ४ डिसेंबर २०२२ रोजी झाला होता. लग्नात मुलीकडून 11 लाख रुपये, कार आणि सोन्यासह इतर मौल्यवान वस्तू हुंडा म्हणून दिल्या होत्या. असे असूनही सासरचे लोक खुश नव्हते. त्यांची फॉर्च्युनर कार आणि २१ लाख रुपयांची मागणी होती. अशातच करिश्माने एका मुलीला जन्म दिला त्यामुळे सासरच्यांनी तिचा आणखी छळ सुरू केला.

मुलीच्या तक्रारीनंतर करिश्माच्या कुटुंबीयांनी अनेकदा गावात येऊन समाजातील लोकांना बोलावून पंचाईतीमध्ये वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. यासाठी करिश्माच्या सासरच्या मंडळींना 10 लाख रुपये देण्यात आले, मात्र त्यांची हुंड्याची मागणी पूर्ण झाली नाही. अशातच 29 मार्च रोजी त्याने मोठ्या बहिणीला फोन करून पती, सासू, सासरे, वहिनी यांनी मारहाण केल्याचे सांगितले. (Crime News in Marathi)

UP Crime News
MNS Clash News : मनसे पदाधिकारी- कार्यकर्त्यांची एकाला बेदम मारहाण, VIDEO व्हायरल; गजानन राणेंसह २० साथीदारांवर गुन्हा

यानंतर मुलीचा भाऊ दीपक आणि त्याचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले तेव्हा करिश्माची हत्या तिच्या सासरच्या मंडळींनी केल्याचे त्यांना समजले. या घटनेनंतर मुलीच्या कुटुबियांकडून करिश्माचा पती विकास, सासरा सोम पाल भाटी, सासू राकेश, मेहुणी रिंकी आणि दीर सुनील आणि अनिल यांच्याविरुद्ध इकोटेक येथे हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पती विकास आणि सासरे सोमपाल भाटी यांना अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

UP Crime News
Beed News: धक्कादायक; चुलत्यानेच केला 14 वर्षीय पुतणीवर अत्याचार, असा उघडकीस आला प्रकार

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com