MNS Clash News : मनसे पदाधिकारी- कार्यकर्त्यांची एकाला बेदम मारहाण, VIDEO व्हायरल; गजानन राणेंसह २० साथीदारांवर गुन्हा

MNS Clashes News : मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला आहे. घटना घडली तेव्हा कामगार नेते गजानन राणे तिथे उपस्थित होते. मारहाण करणारे कार्यकर्ते हे गजानन राणे यांचे असल्याचं समजलंय.
MNS Clash News
MNS Clash NewsSaam TV

आवेश तांदळे

Gajanan Rane News :

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मनसे कामगार नेते गजानन राणे यांच्या कार्यकर्त्यांची आणि मनसे पदाधिकाऱ्यांची भररस्त्यात बेदम हाणामारी झाली आहे. या घटनेत काही कार्यकर्ते गंभीर जखमी झालेत. अगदी रक्तबंबाळ होइपर्यंत मारहाण झाली आहे.

MNS Clash News
Shegaon Gajanan Maharaj Prakat Din : संत गजानन महाराजांना 146 वा प्रकट दिन | Marathi News

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, काल रात्री उशिरा चांदीवली परिसरात हा वाद झाला. मात्र यावरून मनसेचा अंतर्गत वाद समोर आल्याचं पाहायला मिळतंय. झालेल्या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला आहे. घटना घडली तेव्हा कामगार नेते गजानन राणे तिथे उपस्थित होते. मारहाण करणारे कार्यकर्ते हे गजानन राणे यांचे असल्याचं सांगण्यात येतं.

घटनेनंतर या प्रकरणी साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. आर्थिक व्यवहारातून ही हाणामारी झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आलीये.

स्थानिक मनसे पदाधिकारी गजानन राणे आणि मारहाण झालेली व्यक्ती यांच्यात आधीपासून जुना वाद होता. हाच वाद मिटवण्याकरता काल गजानन राणे त्यांच्या काही साथीदारांसह त्यांना भेटण्याकरता गेले. बातचीत सुरू असताना त्यांच्यात आधी वाद झाला पुढे हा वाद टोकाला गेला आणि गजानन राणे यांच्या साथीदारांनी सदर व्यक्तीस बेदम मारहाण केली.

दरम्यान या घटनेनंतर साकीनाका पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. गजानन राणे आणि त्यांच्या इतर 20 साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच पोलिसांनी अटकेची कारवाई देखील सुरू केली आहे.

MNS Clash News
MNS Padwa Melava: ब्रेकिंग! शिवाजी पार्कवर 'राज गर्जना'; मनसेच्या पाडवा मेळाव्याला पालिकेची परवानगी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com