प्रसाद जगताप, साम टीव्ही, प्रतिनिधी
नुकतंच लग्न करुन भारतात परतलेल्या एका जोडप्याचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झालाय. ज्यांनी अगदी काही दिवसांपूर्वीच कोर्ट मॅरेज केलं. जे जोडपं भारतात येऊन सप्तपदी घेणार होते. तेच जोडपं, आगीत होरपळून संपलंय. कॅनडातून भारतात आलेल्या या जोडप्याचा संसार फुलण्याआधीच आगीत जळून खाक झालाय. लव मॅरेज करून मायदेशी परतलेलं हे जोडपं ज्या गेमिंग सेंटरमध्ये गेलं. त्याच गेमिंगसेंटरवर अग्नितांडव झाला. ज्यात या जोडप्याचाही दुर्दैवी अंत झाला.
काळजाला चटका लावून जाणारी ही घटना गुजरातच्या राजकोटमध्ये घडलीये. 26 मे रोजी राजकोटच्या टीआरपी गोमिंग झोनमध्ये भीषण अग्नितांडव झाला. ज्यात 28 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या आगीत कित्येक संसार तर जळून खाक झालेच. पण, ज्यांनी सोबत संसार करायच्या नुकत्याच आणाभाका घेतल्या, अशा या जोडप्यालाही या आगीने आपल्या कवेत घेतलं.
मूळचा राजकोटचा असणारा अक्षय ढोलारिया हा शिक्षण आणि नोकरीनिमित्त कॅनडात स्थायीक झाला होता. 10 दिवसांपूर्वीच ख्याती सावलीयाशी कोर्ट मॅरेज झालं होतं. डिसेंबरमध्ये दोघेही भारतीय रितीरीवाजानुसार लग्नही करणार होते. सगळंकाही सुरळीत चाललं होतं. दोघेही कुटुंबिय अगदी आनंदात होते. पण, याच आनंदात विरजन टाकलं ते, 26 मे ने 26 मे हा दिवस राजकोट वासीयांसाठी आणि विशेषत: टीआरपी गोमिंग झोनमध्ये जाणाऱ्या लोकांसाठी काळा दिवस ठरला.
याच गेमिंग झोनमध्ये त्या दिवशी अक्षय, अक्षयची पत्नी ख्याती आणि अक्षयची मेव्हणी हरीता गेम गेले होते. पण, काळाने डाव पलटला गेमिंग झोनमध्ये भीषण आग लागली. ज्यात अक्षय आणि ख्यातीसहीत तब्बल 28 जिवंत होरपळले.
अमेरीकेत राहणाऱ्या अक्षयच्या आईवडीलांनी ही बातमी जड अंतकरणाने कळवण्यात आलीये. ज्या लेकाच्या डोक्यावर ते अक्षता टाकायला येणार होते. आता आगीत जळून खाक झालेल्या त्याच लेकाची ओळख पटावी म्हणून त्यांना डिएनए सॅम्पल द्यायला बोलावण्यात आलंय. ख्यातीच्या घरी काही वेगळी परिस्थिती नाहीये. ज्या लेकीचं वडिलांना कन्यादान करायचं होतं, त्याच लोकीच्या कोळसा झालेल्या देहाला अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्यावर आलीये. ज्या घरात लग्नासाठी सनई चौघडे वाजणार होते. त्याच घरात आता कानठळ्या बसवणारा आक्रोश आणि अश्रूचां महापूर आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.