Tanaji Galgunde Interview : "ही लग्नव्यवस्थाच पटत नाही, आता फक्त लिव्ह इन रिलेशनच...", 'सैराट' फेम अभिनेत्याने मांडलं लग्नसंस्थेबाबत परखड मत

Tanaji Galgunde On Marriage : नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपटातून अभिनेता तान्हाजी गालगुंडे प्रसिद्धी झोतात आला होता. अभिनेत्याने एका मुलाखतीत लग्नासंस्था आणि लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.
Tanaji Galgunde Interview : "ही लग्नव्यवस्थाच पटत नाही, आता फक्त लिव्ह इन रिलेशनच...", 'सैराट' फेम अभिनेत्याने मांडलं लग्नसंस्थेबाबत परखड मत
Tanaji Galgunde On MarriageSaam Tv

सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' चित्रपटाचा समावेश होतो. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल १०० कोटींहून अधिकची कमाई केलेली आहे. या चित्रपटाने अवघ्या महाराष्ट्राला अक्षरश: वेड लावले होते. या चित्रपटाची आजही प्रेक्षकांमध्ये क्रेझ आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत सगळे नवखे कलाकार होते. त्यानंतर ते संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके झाले.

चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रिंकु राजगुरु, आकाश ठोसर, तानाजी गळगुंडे आणि अरबाज शेख होता. या चित्रपटानंतर सर्वांच्याच करियरला चांगलीच कलाटणी मिळाली आहे. चित्रपटामध्ये लंगड्याची भूमिका अभिनेता तानाजी गळगुंडे यांनी साकारली आहे. त्याने एका मुलाखतीमध्ये लग्नासंस्था आणि लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

नुकतंच अभिनेत्याने 'आरपार' युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. मला लग्नव्यवस्था पटत नाही, मी खूप पुढे गेलो असेन, पण मला फक्त लिव्ह इन रिलेशन पटतं असं मुलाखतीत तानाजी गळगुंडे म्हणाला आहे. "मला लग्न ही व्यवस्थाच पटत नाही. कदाचित मी खूप पुढे गेलो असेन, पण मला आता फक्त आणि फक्त Live In Relation च पटतं. तुम्ही एखाद्या माणसाला आवडतात. एकतर ती लग्नाअगोदर बघायचं. त्या मुलीला आपण आवडतोय की नाही माहित नाही. पण लग्न करायचं म्हणजे सगळ्या लोकांनी एकत्र यायचं. एका दिवसासाठी इतका जास्त खर्च कशासाठी ? एवढा मोठा तामझाम करायचा, ५ ते १० लाख रुपये खर्च करायचे. मग नंतर वाजत- गाजत वरात काढायची. बँड बाजा लावून नाचायचं ही चांगली गोष्ट आहे. नाचू आपण..."

पुढे मुलाखतीमध्ये तानाजी गळगुंडे म्हणाला, "इतका खर्च करण्यापेक्षा आपण सर्वांनी मिळून एक छोटे खानी पार्टी करायला हवी, असं मला वाटतं. लग्न करायचंच असेल तर रजिस्टर पद्धतीने लग्न करावं. खरंतर माझी विचारसरणी फार वेगळी आहे. सध्या मला तरी Live In Relation मध्ये राहणंच सोयीस्कर वाटत आहे. कमीत कमी खर्चात लग्न केलं तर जरा बरं वाटतं. २ ते ४ हजारात लग्न आणि बाकी हार तुरा घातला की झालं." असं म्हणत तानाजीने लिव्ह इन रिलेशनविषयी आपल्याला योग्य वाटत असल्याचं सांगितलं.

Tanaji Galgunde Interview : "ही लग्नव्यवस्थाच पटत नाही, आता फक्त लिव्ह इन रिलेशनच...", 'सैराट' फेम अभिनेत्याने मांडलं लग्नसंस्थेबाबत परखड मत
Amrish Puri Birth Anniversary : काय सांगता... बॉलिवूडच्या खलनायकाने केली होती मराठी सिनेसृष्टीतून करियरची सुरूवात; चित्रपटही आहे गाजलेला

तानाजी 'सैराट'नंतर 'गस्त', 'झुंड', 'माझा अगडबम', 'फ्रिट हिट दणका', 'एकदम कडक' आणि 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यामधील त्याच्या भूमिकांनी प्रेक्षकांचीही मनं जिंकली आहेत.

Tanaji Galgunde Interview : "ही लग्नव्यवस्थाच पटत नाही, आता फक्त लिव्ह इन रिलेशनच...", 'सैराट' फेम अभिनेत्याने मांडलं लग्नसंस्थेबाबत परखड मत
Vijay Thalapathy Birthday : सुपरस्टार विजय थलापतीचं खरं नाव माहितीये का? एकेकाळी ५०० रुपये कमावणारा अभिनेता आज कोट्यवधींचा मालक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com