Vijay Thalapathy Birthday : सुपरस्टार विजय थलापतीचं खरं नाव माहितीये का? एकेकाळी ५०० रुपये कमावणारा अभिनेता आज कोट्यवधींचा मालक

Do You Know Vijay Thalapathy Real Name : दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजयचा आज (२२ जून) ५० वा वाढदिवस आहे. अभिनेत्याचं खरं नाव विजय थलापती नाही. वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे त्याने नावात बदल केला.
Vijay Thalapathy Birthday : सुपरस्टार विजय थलापतीचं खरं नाव माहितीये का ?, एकेकाळी ५०० रुपये कमावणारा अभिनेता आज आहे कोट्यवधींचा मालक
Thalapathy Vijay BirthdayInstagram/ @actorvijay

दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय आज (२२ जून) आपला ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. तो एक असा स्टार आहे जो रजनीकांत यांच्यापेक्षाही सर्वाधिक मानधन घेतो. विजयचं खरं नाव विजय थलपती नाही. त्याचं खरं नाव खूप भलंमोठं होतं. थलपती विजयचं खरं नाव जोसेफ विजय चंद्रशेखर असं आहे. त्याने नाव प्रसिद्ध दिग्दर्शक आणि वडील एस.ए.चंद्रशेखर यांच्या सांगण्यावरून नाव बदललं.

Vijay Thalapathy Birthday : सुपरस्टार विजय थलापतीचं खरं नाव माहितीये का ?, एकेकाळी ५०० रुपये कमावणारा अभिनेता आज आहे कोट्यवधींचा मालक
Bai Ga Teaser : पाच बायका फजिती ऐका, 'वटपौर्णिमे'च्या दिवशी 'बाई गं'चा धमाकेदार टीझर रिलीज

विजयने आपल्या सिनेकरियरमध्ये थलापती हे नाव वापरलेलं आहे. थलापतीचा अर्थ सेनापती किंवा कमांडर असा होतो. आजच्याघडीला इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन आकारणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये विजयचं नाव पहिलं येतं. मात्र, आज जरीही विजय घसघशीत मानधन आकारात असला, तरी त्याला त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी अवघे ५०० रुपये मिळाले होते. त्याने वयाच्या १० व्या वर्षी ‘वेत्री’ चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या सिनेकरिअरची सुरुवात केली होती. तर १८ वर्षांचा असताना ‘नलाय थेरपू’ चित्रपटातून विजयने प्रमुख अभिनेता म्हणून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती.

विजयने आतापर्यंत जवळपास ६५ हून चित्रपटांमध्ये काम केले आहे. विजयचा समावेश अनेकदा फोर्ब्सच्या यादीत करण्यात आलेला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, विजय एका चित्रपटासाठी १०० कोटींच्या आसपास मानधन घेत असून तो ४०० कोटींहून अधिक संपत्तीचा मालक आहे. विजयचं वार्षिक उत्पन्न १०० ते १२० कोटींच्या आसपास आहे. बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात प्रियंका चोप्रा हिच्या ‘थामिझन’ चित्रपटातून विजयने सिनेकारकिर्दीची सुरुवात केली. त्या चित्रपटात प्रियंका आणि विजयने एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. त्यासोबतच विजयने सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवीसोबतही काम केले आहे.

Vijay Thalapathy Birthday : सुपरस्टार विजय थलापतीचं खरं नाव माहितीये का ?, एकेकाळी ५०० रुपये कमावणारा अभिनेता आज आहे कोट्यवधींचा मालक
Prathamesh Kshitija Vat Purnima : "सात जन्मासाठी नाही तर प्रत्येक जन्मासाठी..."; प्रथमेश- क्षितीजाची लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा, लूकची होतेय चर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com