Matka King Start Shooting : नागराज मंजुळे यांच्या ‘मटका किंग’मध्ये सई ताम्हणकरची एन्ट्री, वेबसीरीजच्या शुटिंगला सुरुवात

Matka King Series Entered To Sai Tamhankar : गेल्या काही दिवसांपूर्वी नागराज मंजुळेंच्या ‘मटका किंग’ या सीरीजची घोषणा करण्यात आली. नुकताच या सीरीजच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. अशातच सीरीजमध्ये नवीन स्टारकास्टचीही एन्ट्री झाली.
Matka King Start Shooting : नागराज मंजुळे यांच्या ‘मटका किंग’मध्ये सई ताम्हणकरची एन्ट्री, वेबसीरीजच्या शुटिंगला सुरुवात
Matka King Series Entered To Sai TamhankarSaam Tv

गेल्या काही दिवसांपूर्वी ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’ने अनेक वेबसीरीज आणि वेबफिल्म्सची घोषणा केलेली आहे. त्या यादीमध्ये नागराज मंजुळेंची ‘मटका किंग’ या सीरीजचाही समावेश आहे. अशातच या सीरीजच्या शुटिंगला १२ जूनपासून सुरुवात झालेली आहे. निर्मात्यांनी आणि सीरीजमधील कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयीची माहिती दिली. 'मटका किंग'मध्ये अभिनेता विजय वर्मासह कोण कोण सेलिब्रिटी प्रमुख भूमिकेत दिसणार हे स्पष्ट झाले आहे.

Matka King Start Shooting : नागराज मंजुळे यांच्या ‘मटका किंग’मध्ये सई ताम्हणकरची एन्ट्री, वेबसीरीजच्या शुटिंगला सुरुवात
Sonakshi And Jaheer Wedding Card : अखेर ठरलं! सोनाक्षी आणि जहीरचं वेडिंग कार्ड व्हायरल; लग्नाला जाणाऱ्या पाहुण्यांना पाळाव्या लागतील अटी शर्ती

सई ताम्हणकरसाठी २०२४ हे वर्ष खूपच खास आहे. या वर्षात तिने नवीन अलिशान कारही खरेदी केली आहे. त्यासोबतच ती चित्रपटांसह वेबसीरीजमध्येही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'श्रीदेवी प्रसन्न' या मराठी चित्रपटात तर 'भक्षक' या हिंदी चित्रपटात सई दिसली होती. त्या चित्रपटानंतर सई 'अग्नी', 'ग्राउंड झिरो' आणि 'डब्बा कार्टेल' या प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे. तिच्या ह्या आगामी प्रोजेक्टमध्ये नागराज मंजुळे यांच्या ‘मटका किंग’ या सीरीजचाही समावेश होणार आहे. या प्रोजेक्टसाठी सई आणि नागराज पहिल्यांदाच एकत्र आले आहेत.

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आजवर मराठी सिनेसृष्टीमध्ये उत्तमोत्तम आशय असणारे आणि हटके कथानक असणारे चित्रपट त्यांनी प्रेक्षकांना दिले आहेत. सोबतच दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी ‘झुंड’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते.

आता नागराज यांनी ‘मटका किंग’ या वेबसीरीजच्या माध्यमातून ओटीटी विश्वामध्ये डेब्यू केले आहे. या वेबसीरीजची निर्मिती रॉय कपूर फिल्म्स, आटपाट आणि एसएमआर प्रॉडक्शनकडून करण्यात आली आहे.

तर सिद्धार्थ रॉय कपूर, नागराज मंजुळे, अश्विनी सिडवानी, आशिष आर्यन हे निर्माते आहेत. तर, अभय कोरणे आणि नागराज मंजुळे यांनी कथानकाचे लेखन केले आहे. तर या वेबसीरीजचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे.

Matka King Start Shooting : नागराज मंजुळे यांच्या ‘मटका किंग’मध्ये सई ताम्हणकरची एन्ट्री, वेबसीरीजच्या शुटिंगला सुरुवात
Hamare Baraah Controversy : सुप्रीम कोर्टाकडून अन्नू कपूर यांच्या 'हमारे बारह'च्या प्रदर्शनाला स्थगिती, नेमकं कारण काय?

वेबसीरीजचे कथानक काय ?

या वेबसीरीजची शुटिंग मुंबईमध्ये झाली आहे. मुंबईतला कापसाचा व्यापारी मटका जुगाराचा व्यवसाय कशा पद्धतीने चालवतो ?, तो व्यापारी मटका जुगाराच्या माध्यमातून कशाप्रकारे आपले साम्राज्य उभारतो? हे आपल्याला वेब सीरिजच्या कथेत दिसेल. मटका किंग रतन खत्रीच्या आयुष्यावर आधारित वेब सीरिज आहे. या वेबसीरिजमध्ये मुंबईतील 60-70 दशकातील चित्रण असणार आहे.

Matka King Start Shooting : नागराज मंजुळे यांच्या ‘मटका किंग’मध्ये सई ताम्हणकरची एन्ट्री, वेबसीरीजच्या शुटिंगला सुरुवात
Shashank Ketkar Angry Post : मुंबईच्या रस्त्यावर कचऱ्याचे मोठमोठे ढीग; संतापलेला शशांक केतकर म्हणतोय, "याला जबाबदार..."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com