Nagraj Manjule New Film: मराठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे नेहमीच आपल्या वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमुळे चर्चेत राहतात. नुकताच गेल्या काही दिवसांपुर्वी नाजराज मंजुळेंचा ‘घर बंदुक बिरयानी’ या चित्रपटामुळे ते बरेच चर्चेत आहे.
नेहमीच आगळा वेगळा विषय, हटके कथा देणाऱ्या नागराज मंजुळेंनी नुकताच नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. यावेळी नागराज मंजुळेंनी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयांवर चित्रपट न करता एका खेळाडूच्या बायोपिकची घोषणा केली.
यापूर्वी नागराज मंजुळेंनी दिग्दर्शित केलेल्या ‘फॅन्ड्री’, ‘सैराट’ आणि ‘नाळ’ चित्रपटाचे सर्वत्र कौतुक झाले. जिओ स्टुडिओचा इन्फिनाईट टुगेदर सोहळा नुकताच मुंबईत मोठ्या थाटात पार पडला. यावेळी जिओ स्टुडिओची निर्मिती असलेल्या विविध भाषांमधील आगामी १०० चित्रपटांची घोषणा या सोहळ्यात यावेळी करण्यात आली. यावेळी नागराज मंजुळे यांनी देखील त्यांच्या आगामी चित्रपटाची अधिकृत घोषणा केली. विशेष म्हणजे नागराज मंजुळेंचा हा एका महान खेळाडूवरील बायोपिक आहे.
नागराज मंजुळेंच्या या चित्रपटाचे नाव ‘खाशाबा’ असं असणार असून हा चित्रपट 1952 मध्ये उन्हाळी ऑलम्पिक मध्ये भारतासाठी कांस्यपदक मिळवणारे फ्री स्टाईल कुस्तीपटू खाशाबा दादा साहेब जाधव यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांनी कोल्हापुरात ‘घर बंदुक बिरयानी’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एका कार्यक्रमात ‘खाशाबा’ चित्रपटाची घोषणा केली. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यात कोणते कलाकार मुख्य भूमिकेत असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.