Gurugram: मोठी दुर्घटना! सहाव्या मजल्यावरील इमारतीचा स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू

दिल्ली जवळ असलेल्या गुरुग्राममध्ये (Gurugram) काल रात्री एक मोठी दुर्घटना घडली आहे.
Building Accident Gurugram
Building Accident GurugramTwitter/@ANI

गुरुग्राम: दिल्ली जवळ असलेल्या गुरुग्राममध्ये (Gurugram) काल रात्री एक मोठी दुर्घटना घडली आहे. गुरुग्रामच्या सेक्टर 109 मधील द्वारका एक्स्प्रेसमधील 22 मजली इमारतीचा काही भाग तिथे बांधकाम सुरू असताना कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात दोन जणांचा मृत्यु झाला आहे. इमारतीचा काही भाग कोसळला असता परिसरात गोंधळ उडाला होता.

या अपघाताची माहीती मिळताच गुरुग्राम पोलिस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले दाखल झाले होते. सध्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम या पथकामार्फत सुरु करण्यात आले होते. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली चार कुटुंब अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

याबद्दल मिळालेली माहिती अशी की, गुरुग्राममधील द्वारका एक्सप्रेसजवळील चिंतल पॅराडिसो सोसायटीच्या डी टॉवरच्या सहाव्या मजल्यावर बांधकाम सुरू होते, याच दरम्यान ब्लॉक डी टॉवर 4 च्या दिवाणखान्याचा स्लॅब अचानक कोसळला गेला. त्यामुळे सहाव्या ते पहिला मजल्यापर्यंत स्लॅब कोसळून खाली आला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com