Crime News: गळा आवळून केली पत्नीची हत्या; पती मृतदेहासोबत तीन दिवस राहिला, घटनेनं गाझियाबाद हदरलं

Husband Killed Wife: पतीने आपल्याच पत्नीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तो तीन दिवस त्या मृतदेहासोबत राहिल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधून समोर आली आहे.
Crime News
Crime NewsSaam Tv

Husband Killed Wife Uttar Pradesh Crime

गाझियाबादमध्ये पतीने पत्नीची गळा आवळून हत्या (Husband Killed Wife) केली. याबाबत कोणाला सुगावा लागू नये, म्हणून त्यानी मृतदेह घरातच ठेवला. तीन दिवसांनी घरातून उग्र वास आल्यावर शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलंय. सध्या आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात आहे. (Crime News in Marathi)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गाझियाबादमध्ये स्वत:च्या पत्नीची हत्या करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण मसुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर नगर कॉलनीतील आहे. येथे दारूच्या दुकानात काम करणाऱ्या भरतने त्याची ५१ वर्षीय पत्नी सुनीता हिचा गळा दाबून खून केला आहे. मात्र त्यांनी मृतदेहाची कुठेही विल्हेवाट लावली नाही. मृतदेह घरातच ठेवला. तो स्वतः नेहमीप्रमाणे दुकानात कामासाठी जाऊ लागला. मात्र, तीन दिवस मृतदेह घरात ठेवल्यानंतर कुजायला लागला. त्याचा उग्र वास आल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गाझियाबादमधील धक्कादायक घटना

घरातून उग्र वास येत होता. शेजाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून खोलीतून मृतदेह बाहेर काढला. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. आरोपी पती भरत यालाही पोलिसांनी अटक केली (Husband Killed Wife Uttar Pradesh) आहे. त्याची चौकशी केली असता ही धक्कादायक घटना समोर आली. पत्नीचा गळा आवळून खून केल्याचे त्याने कबूल केलं. भरतने सांगितले की, त्याने सुनीतासोबत दुसरं लग्न केलं होतं. सुनीताचंही हे दुसरं लग्न होतं.

दोघांनाही पहिल्या लग्नापासून मुले आहेत. पण दोघांनाही स्वतःची मुले नव्हती. हे दाम्पत्य गेल्या दोन वर्षांपासून आंबेडकरनगर येथे भाड्याच्या घरात राहत होते. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये वारंवार भांडणे होत (Crime News) होती. दोघेही पैशासाठी एकमेकांशी भांडत असत.

Crime News
Crime News: खळबळजनक! दवाखान्यात उपचारासाठी गेली, डॉक्टरने मित्रासह तरूणीवर केला बलात्कार

पत्नीची हत्या केली

भरत हा दारूच्या दुकानात काम करायचा. त्याला दारू पिण्याचं व्यसन होतं. तर सुनीताचं स्वतःचं दुकान होतं. तीन दिवसांपूर्वी त्यांच्यात काही कारणावरून भांडण झालं (Uttar Pradesh Crime News) आणि भरतने सुनीताचा गळा आवळून खून केला.

मात्र, भरतने याबाबत कोणालाही कळू दिलं नाही. तो नेहमीप्रमाणे कामावर जाऊ लागला. तीन दिवसांनंतर शेजाऱ्यांना घरातून तीव्र वास आल्याने त्यांनी डायल-११२ वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेथे त्यांना सुनीताचा मृतदेह (Dead Body) घरात आढळून आला. तिथून उग्र वास येत होता. सध्या आरोपी भरत पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला न्यायालयात हजर करून कोठडी घेण्यात येणार आहे. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.

Crime News
Chandrapur Crime: भयंकर घटना! पतीकडून पत्नी, दोन मुलींची निर्घृण हत्या; तिहेरी हत्याकांडाने चंद्रपूर हादरलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com