उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गोरखपूरच्या इशू रुग्णालयात मृतदेहांवर उपचाराचं प्रकरण अद्याप संपलं नाही, तेच आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एम्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनबरसा मार्केटमधील एक मुलगी तिच्या आईसोबत पायावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांकडे गेली होती. (Latest Crime News)
डॉक्टरने त्याच्या एका सहकाऱ्यासोबत मिळून मुलीवर बलात्कार केला. तिने विरोध केला असता डॉक्टरने मुलीच्या आईला पैशाचे आमिष दाखवून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना ( Crime News) समोर आली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
काय आहे घटना?
मुलीच्या आईने पोलिसांना सांगितले की, ती सोनबरसा मार्केट येथील कृष्णा मेडिकल नावाच्या दवाखान्यात आपल्या मुलीच्या पायावर उपचार घेण्यासाठी गेली होती. क्लिनिक चालवणारे कृष्णानंद विश्वकर्मा याने सोनबरसा येथे क्लिनिक चालवणाऱ्या नित्यानंद यादवलाही उपचाराच्या नावाखाली बोलावलं. उपचाराच्या नावाखाली दोघांनी मुलीच्या पायाला हात लावून तिच्या प्रायव्हेट पार्टचा विनयभंग (Doctor Physically Abused Girl) सुरू केला.
तरुणीने विरोध केला, मात्र दोघांनी बळजबरीने तोंड दाबून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. मुलीच्या आईला दवाखान्याबाहेर बसवले आणि आत येऊ दिले (Uttar Pradesh News) नाही. त्यांच्या तावडीतून मुलीची सुटका झाल्यावर तिने आपल्या आईला मिठी मारली आणि रडत घडलेला प्रकार सांगितला.
पीडितेची वैद्यकीय तपासणी
आईने गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यावर तथाकथित डॉक्टरांनी तिला पैशाचे आमिष दाखवून गप्प करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आजूबाजूचे लोकही तेथे जमा झाले होते. डॉक्टरांनी सांगितले की, उपचारानंतर पैसे मागत असताना हे लोक खोटे आरोप करत आहेत. अशा परिस्थितीत असहाय्य मायलेकीने घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीला सोबत घेतले. या प्रकरणाचा तपास सोनबरसा चौकीचे प्रभारी ज्ञानेंद्र सिंह यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता, तिच्यावर बलात्कार (Physically Abused) झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी एम्स पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात एसपी सिटी कृष्ण कुमार बिश्नोई यांनी सांगितलं की, तरुणीचे जबाब आणि तपास अहवालाच्या आधारे सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कृष्णानंद विश्वकर्मा आणि नित्यानंद यादव या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.