Chandrapur Crime: भयंकर घटना! पतीकडून पत्नी, दोन मुलींची निर्घृण हत्या; तिहेरी हत्याकांडाने चंद्रपूर हादरलं

Chandrapur Nagbhid Crime: चंद्रपूरच्या नागभिड तालुक्यात निर्दयी पतीने पत्नी आणि पोटच्या दोन मुलींची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. या भयंकर घटनेने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला आहे.
Kolhapur Crime News
Kolhapur Crime NewsSaam Digital

Chandrapur Crime News:

चंद्रपूर जिल्ह्यातून एक हादरवुन टाकणारी घटना समोर आली आहे. चंद्रपूरच्या नागभिड तालुक्यात निर्दयी पतीने पत्नी आणि पोटच्या दोन मुलींची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. या भयंकर घटनेने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला आहे. (Crime News in Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur) निर्दयी पतीने पत्नी आणि दोन मुलींची कुऱ्हाडीने वार करत निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागभिड तालुक्यातील मौशी गावात हा हत्येचा थरार घडला. अंबादास तलमले (वय, ५०) असे निर्दयी आरोपीचं नाव आहे.

आरोपीने पत्नी अल्का तळमले (वय,४०) मोठी मुलगी प्रणाली तलमले, (वय,१९) आणि छोटी मुलगी तेजू तलमले (वय, १७) या तिघांचीही कुऱ्हाडीने वार करत निर्घृण हत्या केली. आज पहाटे अंबादास आणि अलका यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. याच भांडणाच्या रागातून रात्री सर्व झोपले असताना आरोपीने तिघींवर कुऱ्हाडीने वार करून हत्या केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kolhapur Crime News
Buldhana Accident: भीषण अपघात! कंटेनर- दुचाकीची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. घरगुती वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक संशय आहे. आरोपीला नागभीड पोलिसांनी अटक केली असून घटनेचा तपास सुरू आहे. दरम्यान, या भयंकर घटनेने संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरुन गेला आहे. (Latest Marathi News)

Kolhapur Crime News
Manoj jarange Patil: नेत्यांना नो एन्ट्री, पंतप्रधानांपासून, राष्ट्रपतींपर्यंत मेल पाठवा.. मनोज जरांगेंचे मराठा बांधवांना आवाहन; नेमकं काय म्हणाले?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com