Eknath Khadse News : कथित भोसरी भूखंड घोटाळा प्रकरण; एकनाथ खडसे यांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार 

High Court Eknath Khadse : कथित भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. एप्रिल २०१८ ला पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता.
Eknath Khadse
Eknath Khadse Saam TV

सचिन गाड | मुंबई

Mumbai News :

भोसरी येथील कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार दिला आहे. खडसे यांची गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. याचा अर्थ असा नाही की खटला चालू शकत नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Eknath Khadse
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी आणि आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी दुसरी अटक, सांताक्रुज पोलिसांची कारवाई

ट्रायल कोर्टाला पुन्हा तपास करण्याचे आदेश देण्याचे अधिकार आहे, असं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. कथित भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. एप्रिल २०१८ ला पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. मात्र ऑक्टोबर २०२२ मध्ये क्लोजर रिपोर्ट मागे घेण्यात आला होता. (Latest Marathi News)

क्लोजर रिपोर्ट स्वीकारून देखील ऑक्टोबर २०२२ ला पोलिसांना पुन्हा तपास करण्याची परवानगी देण्याच्या ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. तत्कालीन मंत्री असल्याने खटला चालवण्यापूर्वी योग्य ती परवानगी न घेतल्याने गुन्हा रद्द करण्याची खडसेंनी मागणी केली होती. मात्र उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळली आहे.

Eknath Khadse
Uddhav Thackeray: जुमलाचं नाव आता मोदी गॅरंटी.. लोकसभा उमेदवारीवरुन उद्धव ठाकरेंचे भाजपवर टीकास्त्र

काय आहे प्रकरण?

पुण्यातील भोसरी येथे भूखंड घोटाळ्याचा आरोप एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर हे प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून कोर्टात सुरु आहे.

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी 2016 मध्ये भोसरीतील एमआयडीसीमध्ये एक जमीन खरेदी केली केली होती. ही जमीन मूळ बाजारभावाच्या अगदी कमी किंमतीत खरेदी केल्याचा आरोप आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com