Manoj jarange Patil: नेत्यांना नो एन्ट्री, पंतप्रधानांपासून, राष्ट्रपतींपर्यंत मेल पाठवा.. मनोज जरांगेंचे मराठा बांधवांना आवाहन; नेमकं काय म्हणाले?

Maratha Reservation: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत असुन धाराशिव जिल्ह्यातील भुम शहरात मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Saam Digital

Manoj Jarange Patil Press Conference:

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत असून धाराशिव जिल्ह्यातील भुम शहरात मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्याआधी जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला.

काय म्हणाले जरांगे पाटील?

"माझी भूमिका राजकीय नाही, समाज माझा मालक आहे. देवेंद्र फडणवीस हे चुकीच्या जागी भिडले. बीड जिल्ह्यात 3400 उमेदवारांचे फॉर्म झाले आहेत असं म्हणत घ्या अत्ता डबरीवर बॅलेट पेपर अंथरणार का? आत्ता आमच्या वावरात मतदान केंद्र टाकावे लागणार असे म्हणत कसे आमच्या वावरात येतात बघतो," असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

फडणवीसांना इशारा..

"देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजातील तरुणांवर केस करत आहेत, बॅनर काढायला लावत आहेत. त्यांचा हा डाव फेल जाणार आहे. मी यांच्या या डावापुढे हरणार नाही. आठ नऊ तारखेपर्यंत मजा बघतो मंग कामाला लागतो त्यांनी मराठ्यांची लाट अंगावर घेऊ नये. सग्या सोयऱ्याची अंमलाबजावणी करावी अन्यथा मराठ्यांशी गाठ आहे," असा इशारा ही फडणवीस यांना दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange Patil
Alibaug MLA Accident : अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कारला अपघात

मराठा बांधवांना आवाहन..

"मराठ्यांनी केसेसला तयार रहा. केस झाली की खुश व्हा. लगेच कोर्टात जाऊन जामीन करुन घ्या. जामीन करायला मराठा वकिलांची फौज तयार आहे. असे म्हणत उद्यापासून पंतप्रधानांपासून राष्ट्रपतीपर्यंत मराठ्यावर अन्याय होत असल्याचे मेल पाठवायची महिम सुरु करुन कोणत्या ही नेत्यांनी आमच्या दारात यायचं नाही," असे पॉम्प्लेट दारावर चिटकून नेत्यांना दारबंदी करण्याचे आव्हान जरांगेंनी दिले आहे. (Latest Marathi News)

Manoj Jarange Patil
Buldhana Accident: भीषण अपघात! कंटेनर- दुचाकीची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com