Accident News: उड्डाणपुलावर भीषण अपघात! कारची आधी डिव्हायडर मग ट्रकला धडक, तीन जण ठार

Delhi Accident News: दिल्लीतील बदरपूर उड्डाणपुलावर शनिवारी रात्री भीषण अपघात झालाय. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.
Delhi Accident News
Delhi Accident NewsSaam Tv
Published On

3 Killed In Truck Hits Car

देशाची राजधानी दिल्लीतील (Delhi) बदरपूर उड्डाणपुलावर (Badarpur Flyover) शनिवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस पथकाने सांगितलं की, फरिदाबादहून येणारी कार चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली होती. त्यामुळे भरधाव वेगातील कार दुभाजकाला धडकली, नंतर पलीकडे गेली आणि समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. (latest accident news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पावने दोनच्या सुमारास हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. डीडी क्रमांक ३ द्वारे बदरपूर पोलीस स्टेशनला पीसीआर कॉल आला होता. यामध्ये फोन करणाऱ्याने माहिती दिली (Delhi Accident News) की, बदरपूर उड्डाणपुलावर होंडा शोरूमजवळ कार आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बदरपूर उड्डाणपुलावर भीषण अपघात

घटनास्थळी पोहोचलेल्या टीमच्या प्राथमिक तपासात तिघांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. ही कार फरिदाबादहून परतत होती. ते एका लग्न समारंभातून घरी जात होते. कारमध्ये एकूण ७ जण (Truck Hits Car) होते.

पोलिसांनी सांगितलं की, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावे २१ वर्षीय राज, ३८ वर्षीय संजू आणि २२ वर्षीय दिनेश अशी आहेत. तर नीरज, अजित, विशाल, अन्सुल अशी अन्य चार जखमींची नावे (Accident News) आहेत. ज्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Delhi Accident News
Parbhani Accident News : कामासाठी घराबाहेर पडला अन् वाटेतच घात झाला...; दुचाकी-ट्रक अपघातात एक जण जागीच ठार

भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

दिल्लीतील बदरपूर उड्डाणपुलावर शनिवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सांगितलं की, हे सर्व लोक फरिदाबादहून दिल्लीला परत येत असताना कारचे नियंत्रण ( Killed In Truck Hits Car) सुटलं, कार डिव्हायडरला धडकली. नंतर रस्त्याच्या पलीकडे जाऊन ट्रकला धडकली.

अपघाताचं स्वरूप अतिशय भीषण होतं. अलीकडे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. भरधाव वेगांमुळे वाहनांच्या अपघातांचं प्रमाण वाढलं आहे.

Delhi Accident News
Jharkhand Train Accident: झारखंडमध्ये भीषण रेल्वे अपघात, एक्स्प्रेसने प्रवाशांना चिरडलं; अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com