Manasvi Choudhary
70 आणि 80 च्या दशकात बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील यांची आज ६८ वी जयंती आहे.
स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ रोजी पुण्यात झाला. स्मिता यांचे वडील राजकीय नेते होते तर आई समाजसेविका होत्या.
लहानपणापासूनच अभिनय आणि नाटकाची आवड असलेल्या स्मिता यांनी हिंदीसह बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम आणि कन्नड बहुभाषिक चित्रपटांमध्येही काम केले.
अवघ्या 10 वर्षांच्या करिअरमध्ये स्मिता यांनी बॉलिवूडला अनेक अविस्मरणीय चित्रपट दिले.
१९७४ सालच्या ब्लॅक अँड व्हाईट 'मेरे साथ चल'या चित्रपटातून स्मिता पाटील यांनी चित्रपटातील कारकिर्द सुरू केली
सावळा रंग, बोलके डोळे, चेहऱ्यावरील हाव-भावमुळे स्मिता पाटील यामुळे अल्पावधीतच त्या लोकप्रिय झाल्या. निशांत, मंथन, भूमिका, द नेक्सेलाइट्स, एलबर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है, चक्र, नमक हलाल, बाजार, शक्ति आणि वारिस यासारंख्या अनेक चित्रपटांमधून स्मिताने भूमिका साकारल्या
दहा वर्षाच्या कारकिर्दीत स्मिता पाटील यांना ३ नॅशनल अवॉर्ड, २ फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. तसेच स्मिता यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री देऊन सन्मानित केले होते.