Bollywood Actress Tamannaah Bhatia Summoned By Maharashtra Cyber Cell In Illegal IPL Streaming Case Instagram
मनोरंजन बातम्या

Tamannaah Bhatia Today Inquiry : तमन्ना भाटियाची महाराष्ट्र सायबर सेलकडून होणार चौकशी, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Tamannaah Bhatia Inquiry By Maharashtra Cyber Cell : टॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया हिची आज महाराष्ट्र सायबर सेलकडून चौकशी केली जाणार असून तिला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

Chetan Bodke

Tamannaah Bhatia Today Inquiry

टॉलिवूड आणि बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया हिची आज महाराष्ट्र सायबर सेलकडून चौकशी केली जाणार आहे. अभिनेत्रीला आज चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिलेले आहे. अभिनेत्री चौकशीसाठी उपस्थित राहणार का ? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तमन्नाने २०२३ मध्ये आयपीएलचा सामना फेअरप्ले अ‍ॅपवर (Fairplay App) लाईव्ह स्ट्रीम केला होते. यामुळे व्हायाकॉम कंपनीला कोट्यवधींचं नुकसान झाले होते. या प्रकरणी अभिनेत्रीला समन्स बजावले आहे.

आयपीएल २०२३ चे अभिनेत्रीने अनधिकृतरित्या स्क्रीनिंग केले होते. त्यामुळे वायकॉमला तब्बल १०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप वायकॉमने केलेला आहे. या प्रकरणी २३ एप्रिलला बॉलिवूड अभिनेता संजय दत्तलाही महाराष्ट्र सायबर सेलने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र संजय दत्त चौकशीसाठी हजर झाला नव्हता. संजय दत्तने सायबर सेलला दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता काही नियोजित कामांमुळे तो मुंबईमध्ये नाही. म्हणून अभिनेत्याने चौकशीसाठी वेळ मागितला आहे.

महाराष्ट्र सायबर सेलने व्हायकॉमच्या तक्रारीवरून फेअरप्ले अ‍ॅपविरोधात एफआयआर नोंदवला आहे. प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तमन्नाची आज चौकशी केली जाणार आहे. तमन्ना भाटियाने फेअरप्ले अ‍ॅपची जाहिरात केल्यामुळे तिला साक्षीदार म्हणून चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. सायबर पोलिसांना अभिनेत्रीकडून हे समजून घ्यायचंय की, तिला जाहिरात करण्यासाठी तिच्यासोबत कोणी संपर्क साधला होता?, तिला ही जाहिरात कशी मिळाली ?, या जाहिरातीसाठी अभिनेत्रीला किती मानधन मिळाले ? यासाठी तिला चौकशीसाठी बोलवले आहे.

भाईजानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या शूटर्सना कोर्टात हजर केले जाणार

दरम्यान, आज अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शूटर्सना गुन्हे शाखेकडून आज कोर्टात हजर केले जाणार आहे. हल्लेखोर विक्की गुप्ता आणि सागर पाल या दोघांनाही मोक्का कोर्टात हजर केलं जाणार आहे. मोक्का कायद्याअंतर्गत आरोपींची पोलीस कोठडी ३० दिवसांची आहे. विकी आणि सागर यांना पोलिसांनी गुजरातच्या भूजमधून अटक केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng सामना उशिराने सुरु, पावसामुळे भारताची विजयाची संधी हुकणार?

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

SCROLL FOR NEXT