TRP Rating Of Marathi Serial : तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’चा टीआरपी घसरला; पहिल्या क्रमाकांवर कोणती मालिका?

Marathi Tv Serial TRP Rating : १३ एप्रिल ते १९ एप्रिल दरम्यानचं टीआरपी रेटिंग कार्ड जाहीर झालेलं आहे. जाणून घेऊया टीआरपीच्या शर्यतीत कोणत्या मालिकांनी टॉप १० मध्ये बाजी मारली आहे...
TRP Rating Of Marathi Tv Serial
TRP Rating Of Marathi Tv SerialSaam Tv

TRP Rating Of Marathi Serial

मराठी सिनेसृष्टीप्रमाणे (Marathi Serial) मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत सध्या निर्मात्यांकडून वेगवेगळे प्रयोग हाताळले जातात. प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. खरंतर मालिका हा प्रेक्षकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. कायमच प्रेक्षक मालिकेच्या टीआरपी यादीबद्दल आतुर असतात. अशातच नुकतंच टीआरपी यादी जाहीर झाली आहे. ‘मराठी टेलिबझ ऑफिशियल’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टीआरपी यादी जाहीर झाली आहे. (Tv Serial)

TRP Rating Of Marathi Tv Serial
Kranti Redkar Video : क्रांती रेडकरने स्वत:लाच दिलंय चॅलेंज; म्हणाली “पाच दिवसांत जमलं नाही तर...”

१३ एप्रिल ते १९ एप्रिल दरम्यानचा हा टीआरपी चार्ट आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर ‘ठरलं तर मग’ मालिकेने बाजी मारली आहे. हा लेटेस्ट TRP रिपोर्ट असून पुन्हा एकदा टीआरपीच्या खेळामध्ये पुन्हा एकदा जुई आणि अमितच्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेनेच बाजी मारली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मालिकेने टीआरपी यादीमध्ये आपलं पहिल्या क्रमांकावरील स्थान कायम ठेवलं आहे. तर तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा टीआरपी चार्टमधील क्रमांक घसरताना पाहायला मिळत आहे. जुई आणि अमितच्या ‘ठरलं तर मग’ सिरीयलला टीआरपी रेटिंगमध्ये ६.७ इतके रेटिंग्ज मिळाले आहेत. (Televesion Show)

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेचा टीआरपी चार्टमध्ये दुसरा क्रमांक असून तिसऱ्या क्रमांकावर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका आहे. ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका टीआरपी चार्टमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. तर पाचव्या क्रमांकावर ‘सुख म्हणजे नक्की काय असते’ ही सीरियल आहे. पहिल्या टॉप १४ मध्ये, स्टार प्रवाहवरीलच मालिका पाहायला मिळत आहे. तर टॉप १५ मध्ये, ‘पारू’ ही मालिका आहे. ही मालिका गेल्या काही दिवसांपूर्वीच सुरू झालेली आहे. मालिकेचा ह्या चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढतच चालेला आहे.  (Entertainment News)

TRP Rating Of Marathi Tv Serial
Sahil Khan Arrest : मोठी बातमी!, साहिल खानाला मुंबईत आणलं; कोर्टाकडून ४ दिवसांची पोलिस कोठडी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com