Sahil Khan Arrest : मोठी बातमी!, साहिल खानाला मुंबईत आणलं; कोर्टाकडून ४ दिवसांची पोलिस कोठडी

Mahadev Betting App Case Sahil Khan : अभिनेता साहिल खान याला मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आले असून अभिनेत्याला चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
Sahil Khan Mahadev Betting App Case
Sahil Khan Mahadev Betting App CaseInstagram

Actor Sahil Khan Arrested In Mahadev Betting App Case

महादेव बुक ऑनलाईन बेटिंग ॲप प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली आहे. अभिनेता साहिल खान याला मुंबई पोलिसांनी रविवारी सकाळी छत्तीसगडमधून ताब्यात घेतले. साहिल खानला मुंबईमध्ये आणल्यानंतर हायकोर्टामध्ये दाखल केले होते. यावेळी कोर्टाकडून अभिनेत्याला चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Sahil Khan Mahadev Betting App Case
Sonu Sood Whats Up Get Blocked : अभिनेता सोनू सूदचं व्हॉट्सॲप ब्लॉक; नेमकं कारण काय ?

शनिवारी मुंबई उच्च न्यायालायाने साहिल खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याला रविवारी सकाळी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई हाय कोर्टाकडून अभिनेत्याला चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. अभिनेत्याची पोलीस कोठडी १ मे पर्यंत आहे. ऑनलाइन बेटिंग ॲप्लिकेशनचे प्रमोशन केल्याचा साहिल खानवर आरोप आहे. प्रकरणात सत्र न्यायालयाने अभिनेत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अभिनेत्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र आता उच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अभिनेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

१५ हजार कोटींच्या महादेव बुक ऑनलाईन बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. "द लायन बुक ॲप" नावाच्या एका ॲपमध्ये साहिल खानही भागीदारीमध्ये असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या चौकशीमध्ये समोर आल्यानंतर चौकशीचा ससेमिरा लागला होता. त्यासोबतच त्याने ॲपच्या प्रमोशन आणि त्यांच्या कार्यक्रमात भाग घेतल्याचा पोलिसांनी दावा केलेला आहे. मुंबई पोलिस या प्रकरणाची विशेष चौकशी सध्या करीत आहे.

Sahil Khan Mahadev Betting App Case
Ranbir - Sai Photos Viral Ramayana Movie : ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवरील रणबीर कपूर आणि साई पल्लवीचा फोटो व्हायरल, लूक पाहून नेटकरी म्हणाले...

संपूर्ण गुन्ह्याचे व्यापक स्वरूप पाहता या प्रकरणाचा सखोल तपास आवश्यक असल्याचे न्यायालयाने सांगितले होते. सध्याच्या प्रकरणाची संपूर्ण कारवाई बेकायदेशीर असल्याचे दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात बनावट सिमकार्ड आणि बँक खाती वापरण्यात आली आहेत, त्यामुळे खानविरुद्ध उपलब्ध साहित्य पाहता आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे त्याला अटकेतून दिलासा देता येणार नाही, असे कोर्टाने सांगितले होते.

Sahil Khan Mahadev Betting App Case
Shruti And Santanu Break Up : ४ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर श्रुती हासन आणि शांतनू हजारिकाचा ब्रेकअप?, एकमेकांना इन्स्टाग्रामवर केलं अनफॉलो

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com