Sonu Sood Whats Up Get Blocked : अभिनेता सोनू सूदचं व्हॉट्सॲप ब्लॉक; नेमकं कारण काय ?

Sonu Sood Whats Up Blocked : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट ब्लॉक झाल्याचे वृत्त समोर आले आहे. सोनूने एक्स हँडलवरून लवकरात लवकर व्हॉट्सअ‍ॅपची सेवा सुरळीत करण्याची विनंती केली आहे.
Sonu Sood Whats Up Get Blocked
Sonu Sood Whats Up Get BlockedSaam Tv

Sonu Sood Seek For Help By Tweet As His Whats Up Get Blocked

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कायमच चर्चेत राहण्याच्या प्रयत्नात असतो. सोनू सूद सामाजिक कार्यामुळे कमालीचा चर्चेत राहिलेला आहे. सोनूने कोरोना काळात अनेक लोकांना मदतीचा हात पुढे केला होता. त्यानंतर देखील कित्येक वेळा त्याने गरजवंतांची मदत केली आहे. त्याने केलेल्या मदतीमुळे अनेकांनी खूप आभार मानलेही आहेत.

अशातच अभिनेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट ब्लॉक झाल्याचे वृत्त समोर आले आहे. सोनूने आपल्या ऑफिशियल एक्स हँडलवरून याबाबतची माहिती शेअर करत कंपनीकडे आपली अडचण होत असल्याने लवकरात लवकर व्हॉट्सअ‍ॅपची सेवा सुरळीत करण्याची त्याने विनंती केली आहे. (Bollywood)

Sonu Sood Whats Up Get Blocked
Ranbir - Sai Photos Viral Ramayana Movie : ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवरील रणबीर कपूर आणि साई पल्लवीचा फोटो व्हायरल, लूक पाहून नेटकरी म्हणाले...

सोनूने २६ एप्रिलला पहिली एक्सवर एक पोस्ट शेअर केलेली होती. पोस्ट शेअर करताना त्याने व्हॉट्सॲपला टॅग केलेला आहे. तो म्हणतो, " माझा व्हॉट्सॲप नंबर काम करत नाहीये. मी ह्या समस्येचा अनेकदा सामना केलेला आहे. मला वाटतं की तुम्ही सेवा सुरळीत करावी."

त्यानंतर सोनूने काल (२७ एप्रिल) एक्सवर एक पोस्ट शेअर केलेली आहे. त्यामध्ये तो म्हणतो, "@Whatsapp अजूनही माझे अकाउंट काम करत नाही. मित्रांनो, आता जागं होण्याची वेळ आली आहे. ३६ तासांहून अधिक काळ झालेला आहे. मला शक्य तितक्या लवकर माझ्या अकाउंटवर थेट संदेश पाठवा. हजारो गरजू लोकं मदतीसाठी मला मेसेज करण्याचा प्रयत्न करत असतील. कृपया मदत करा...", असं म्हणत सोनूने आपली निराशा व्यक्त केलेली आहे. (Social Media)

Sonu Sood Whats Up Get Blocked
Shruti And Santanu Break Up : ४ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर श्रुती हासन आणि शांतनू हजारिकाचा ब्रेकअप?, एकमेकांना इन्स्टाग्रामवर केलं अनफॉलो

सोनू सुद प्रमाणे तुमचंही व्हॉट्सअ‍ॅप या चुकांमुळे बंद होऊ शकतं, जाणून घ्या...

तुम्ही व्हॉट्सॲपच्या नियम आणि अटींचे उल्लंघन केल्यास, कंपनी तुमचा व्हॉट्सॲप नंबर ब्लॉक करू शकते. पुढीलपैकी एक चूक जरी केली तरी, देखील तुमचं व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट बॅन केलं जाऊ शकतं. कोणत्या आहेत या गोष्टी? जाणून घेऊयात.

  • WhatsApp चालवण्यासाठी थर्ड पार्टी ॲप्स वापरू नका. व्हॉट्सॲपसाठी थर्ड पार्टी ॲप्स वापरणे हे कंपनीच्या धोरणाचे उल्लंघन आहे. GB WhatsApp, WhatsApp Plus आणि WhatsApp Delta यांसारख्या ॲप्सचा वापर केल्याने तुमचे व्हॉट्सॲप खाते बंद होऊ शकते.

  • तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या डीटेल्स वापरून WhatsApp खाते तयार केल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते. दुसऱ्या व्यक्तीच्या डीटेल्स वापरून जर तुम्ही WhatsApp वापरले तुमचे खाते बॅन केले जाऊ शकते.

Sonu Sood Whats Up Get Blocked
Sharman Joshi Birthday : शर्मन जोशीला ‘इडियट’ नाव कसं मिळालं?; अभिनेत्याच्या करियरला ‘या’ चित्रपटांमुळे मिळाली कलाटणी!
  • अनोळखी व्यक्तीला विनाकारण सतत मेसेज करत असाल, त्वरीत थांबवा. त्या व्यक्तीने जर तुमचा नंबर रिपोर्ट केला आणि तुमची चूक जर सिद्ध झाली तर तुमचं अकाउंट ब्लॉक होऊ शकतं.

  • जर तुम्ही कोणाला व्हॉट्सअ‍ॅपवरुन धमकीचा मेसेज, अश्लील मेसेज किंवा कंटेंट पाठवत असाल, तर तुमचा नंबर कंपनी कायमचा बंद करू शकते. म्हणजेच, त्या नंबरवरुन तुम्ही पुन्हा व्हॉट्सअ‍ॅप वापरू शकणार नाही.

Sonu Sood Whats Up Get Blocked
Sahil Khan : अभिनेता साहिल खान मुंबई पोलिसांच्या ताब्यात; महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मोठी कारवाई

दोन्हीही पोस्ट शेअर करताना, सोनूने त्याचे व्हॉट्सॲप बंद असल्याचा स्क्रिनशॉट शेअर केलेला आहे. व्हॉट्सॲपने सोनू सूदचे अकाऊंट का ब्लॉक केले याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सोनू सूदच्या कामाबद्दल बोलायचे तर, सोनू सध्या ॲक्शन-थ्रिलर 'फतेह' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या तो त्याच्या सामाजिक कामासोबत त्याच्या आगामी चित्रपटासाठीही तो काम करीत आहे. चित्रपटाच्या माध्यमातून सोनू दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. 'फतेह' चित्रपटाचे कथानक सायबर क्राईमच्या भीषणतेवर भाष्य करणारा आहे.

Sonu Sood Whats Up Get Blocked
Kushal Badrike: घरातील विषय सार्वजनिक करू नका...; कुशल बद्रिकेची बायकोबद्दल पोस्ट वाचून सोशल मीडिया खळखळला!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com