Kushal Badrike: घरातील विषय सार्वजनिक करू नका...; कुशल बद्रिकेची बायकोबद्दल पोस्ट वाचून सोशल मीडिया खळखळला!

Kushal Badrike Post: 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता कुशल बद्रिके आपल्या कॉमेडीच्या टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवत असतो. कुशल बद्रिके सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. कुशलने सोशल मीडियावर नुकताच बायकोसोबतच एक फोटो शेअर केला आहे.
Kushal Badrike Post
Kushal Badrike PostSaam Tv

'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता कुशल बद्रिके आपल्या कॉमेडीच्या टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवत असतो. कुशल बद्रिकेचे फक्त देशात नाही तर जगभरात चाहते आहेत. कुशल बद्रिके सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. कुशलने सोशल मीडियावर नुकताच बायकोसोबतच एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो खूपच हटके आहे. कारण या फोटोत कुशल बायकोसोबत रोमँटिक पोझ देण्यात नव्हे तर बायकोचे सामान उचलण्यात मग्न असलेले दिसत आहे.

कुशल नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून बायकोसाठी पोस्ट शेअर करत असतो. कुशलने याआधी बायकोचा अभिमान असल्याचे सांगत फोटो शेअर केले होते. मात्र, यावेळी कुशलने मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट केलेल्या फोटोत कुशल आणि त्याची बायको दिसत आहे. कुशलची बायको सुनयना बद्रिके पुढे चालताना दिसत आहे. तर मागून कुशल तिचे सर्व सामान घेऊन येताना दिसत आहे. कुशलच्या पाठीवर बॅग, हातात दोन- तीन पिशव्या दिसत आहे. या फोटोवर कुशलने मजेशील कॅप्शनदेखील दिले आहे. 'मागे एका भांडणात ही म्हणाली होती, सगळ्या संसाराचा भार हिने एकटीनेच उचललाय म्हणून',असं त्याने कॅप्शनमध्ये लिहलं आहे. कुशलने प्रत्येक घरातील गोष्ट या फोटोतून सांगितली आहे,असं नेटकरी म्हणत आहेत.

Kushal Badrike Post
Bhuvan Bam: प्रसिद्ध युट्यूबर भुवनचं शाहरुखच्या पावलावर पाऊल; मुंबईत घेतलं नवकोरं घर

कुशलच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी हे तर आमच्या घरात रोज होत म्हटलेल आहे. या पोस्टवर एका युजरने लिहलं आहे की, 'घरातील विषय सार्वजनिक नका करू दादा.. गरम पोळ्या बंद होतील ना तुमच्या' तर आणखी एकाने लिहलंय की, 'एकाच भांडणात ना नक्की दादा'. कुशलची ही पोस्ट खूपच मजेशीर आहे. या पोस्टवर तेजस्वीनी पंडितनेदेखील हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

Edited By-Siddhi Hande

Kushal Badrike Post
Tharla Tar Mag: सायली अर्जुन खरे नवरा- बायको नाहीत...; चैतन्यने सांगितलं साक्षीला सत्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com