Bhuvan Bam: प्रसिद्ध युट्यूबर भुवनचं शाहरुखच्या पावलावर पाऊल; मुंबईत घेतलं नवकोरं घर

Bhuvan Bam Purchase House in Mumbai: लोकप्रिय यूट्यूबर, लेखक, गायक, गीतकार आणि कॉमेडियन भुवन बाम (Bhuvan Bam) सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. भुवन बामने मुंबईत आपले स्वतः चे घर घेतले आहे.
Bhuvan Bam
Bhuvan BamSaam Tv

लोकप्रिय यूट्यूबर, लेखक, गायक, गीतकार आणि कॉमेडियन भुवन बाम (Bhuvan Bam) सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. भुवन बामने मुंबईत आपले स्वतः चे घर घेतले आहे. भुवन बामने दिल्लीतून मुंबईत स्थायिक होण्याची घोषणा केली आहे. हा त्याच्या करिअरसाठी महत्त्वाचा निर्णय असल्याचे सांगितले जात आहे. भुवन बामने खरेदी केलेल्या घराबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

भुवन बामचे देशभरात खूप चाहते आहे. मुंबईतील तरुणाईमध्ये त्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. भुवन दिल्लीपेक्षा मुंबईतच जास्त वेळ असतो. त्यामुळेच त्याने मुंबईत नवीन घर घेतले आहे.

भुवन बामने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले की, 'मी मुंबईतील नवीन अध्यायासाठी तयार आहे. शहरात मनोरंजन क्षेत्रात प्रगती करण्यासाठी अनेक संधी आहे. मी पहिल्यापासूनच मुंबईतील ऊर्जेला आणि सकारात्मेला आकर्षित आहे. माझे काम जास्त मुंबईत असते. त्यामुळे हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे'.

Bhuvan Bam
Tharla Tar Mag: सायली अर्जुन खरे नवरा- बायको नाहीत...; चैतन्यने सांगितलं साक्षीला सत्य

भुवन बामचा युट्यूबवर 'BB की Vines' नावाचा कॉमेडी चॅनल आहे. भुवन बामचे खरं नाव भुवन अरविंद्र शंकर बाम असे आहे. त्यांच्या कामामुळे तो लोकांमध्ये भुवन बाम म्हणून लोकप्रिय आहे. भुवन बाम हा मूळचा गुजरातमधील वडोदरा येथील मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. भुवनला लहानपणापासूनच गाण्याची आणि नवीन क्रिएटीव्हिटीची आवड आहे. त्यांचा आवाज खूपच चांगला आहे त्यामुळे त्याने गायनाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला.

भुवन बाम हा लोकप्रिय युट्यूबर आहे. भुवन बामने मुंबईत घर खरेदी केल्यानंतर शाहरुख खानच्या पाऊलावर पाऊल ठेवले असल्याचे म्हटले आहे. शाहरुख खाननेदेखील दिल्लीतून शिफ्ट होत मुंबईत घर घेतले आहे. त्यामुळेच शाहरुखनंतर भुवनदेखील मुंबईत शिफ्ट झाल्याचे सांगितले आहे.

Bhuvan Bam
Aarti Singh Wedding: गोविंदा-कृष्णा अभिषेक यांच्यातलं भांडण मिटलं? कश्मिरा पाया पडली, माफी मागितली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com