Wardha Crime News: 'यूट्यूब'वर शिकला अन् दुचाकी चोरीचा सपाटा लावला, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Wardha Crime News: 'यूट्यूब'वर दुचाकी चोरीचे व्हिडिओ पाहून ठिकठिकाणी दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दुचाकी चोरी प्रकरणी वर्धा जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेल पथकाने दोघांना अटक केली.
wardha
wardha Saam tv

चेतन व्यास, वर्धा

Wardha Crime News :

'यूट्यूब'वर दुचाकी चोरीचे व्हिडिओ पाहून ठिकठिकाणी दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दुचाकी चोरी प्रकरणी वर्धा जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेल पथकाने दोघांना अटक केली. (Latest Marathi News)

पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील चार दुचाकी असा ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी रितिक श्रीराम वाघाळे (२२) प्रणिकेत केशव नागोसे (१९) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

wardha
Kalyan Crime News: गाडीला चावी पाहिली, चोरीचा मोह झाला अन् फसला; महागड्या गाड्या चोरणारा सराईत चोरटा गजाआड

नालवाडी परिसरात एक तरुण मोटारसायकल विकण्यासाठी फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्यावर संशय असल्याने पोलिसांनी तत्काळ त्यास ताब्यात घेत चौकशी केली.

पोलिसांच्या चौकशीनंतर त्याने दुचाकी सावंगी हद्दीतील येळाकेळी येथून चोरल्याची कबुली दिली. त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने यूट्यूबवर व्हिडिओ बघून वेगवेगळ्या ठिकाणावरून गाड्या चोरल्याचे पोलिसांना सांगितले.

दोन्ही चोरट्यांनी सेलू, हिंगणी व हिंगणा - नागपूर शिवारातून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या दुचाकींची माहिती दिली. चोरट्यांनी ज्या ठिकाणी दुचाकी लपविल्या होत्या, त्या ठिकाणी जात दुचाकी हस्तगत केल्या. दोन्ही आरोपींना सावंगी पोलिस ठाण्याकडे सुपूर्द करून चार गुन्हे उघडकीस आणले.

wardha
UP Crime News: संशयाचं भूत शिरलं, पत्नीचं शीर धडावेगळं केलं; बाराबंकीतील थरकाप उडवणारी घटना

पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, नरेंद्र पाराशर, अमरदीप पाटील, रामकिसन इप्पर, नितीन इटकरे, संघसेन कांबळे, मिथुन जिचकार, अरविंद इंगोले, गणेश खेवले ही कारवाई केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com