Kranti Redkar Video : क्रांती रेडकरने स्वत:लाच दिलंय चॅलेंज; म्हणाली “पाच दिवसांत जमलं नाही तर...”

Kranti Redkar News : अभिनेत्री क्रांती रेडकर हिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत एक आव्हान स्वीकारलं आहे. "जर का मी आव्हान नाही पूर्ण केलं तर माझं नावंच बदला..." असं ती ह्या व्हिडीओमध्ये म्हणाली आहे.
Kranti Redkar Video
Kranti Redkar VideoSaam TV

Kranti Redkar Video

एक बहुआयामी अभिनेत्री आणि आपल्या उत्तम नृत्यशैलीने क्रांती रेडकरने मराठी सिनेसृष्टीमध्ये स्वत:ची प्रतिमा तयार केली आहे. क्रांती रेडकर कायमच इन्स्टाग्रामवर अनेक व्हिडीओ शेअर करत असते. नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, त्यामध्ये तिने एक आव्हान स्वीकारलं आहे. जर का मी आव्हान नाही पूर्ण केलं तर माझं नावंच बदला, असंही ती ह्या व्हिडीओमध्ये म्हणाली आहे.

Kranti Redkar Video
Sahil Khan Arrest : मोठी बातमी!, साहिल खानाला मुंबईत आणलं; कोर्टाकडून ४ दिवसांची पोलिस कोठडी

क्रांती रेडकर कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. ती इन्स्टाग्रामवर अनेकदा मुलगी झिया आणि झ्यादासोबत व्हिडीओ शेअर करत असते. अशातच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये क्रांती म्हणतेय, "माझं ठरलंय. येत्या १० दिवसांत मी पाच किलो वजन कमी करणार आहे आणि जर मी असं नाही केलं तर माझ नाव बदलून टाका. दुसरं काहीतरी चांगलं ठेवा."

“माझ ठरलंय” असं कॅप्शन देत क्रांती रेडकरने हा व्हिडीओ शेअर केलेला आहे. क्रांतीच्या ह्या व्हिडीओवर चाहत्यांकडून हजारो लाईक्स मिळाल्या असून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. क्रांतीच्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत म्हणतात, “वजन कमी झाल्यावर आम्हालाही टिप्स द्याल कसे करायचे ते.”, “उत्क्रांती” असं एका युजरने तिला नाव दिलेलं आहे. “आम्हाला दुसरा कुठलंच नाव ठेवायचं नाहीये जे आहे तेच पाहिजे”, “वजन काटा कमी करून टाका, वजन आपोआप कमी होईल” असा ही मिश्किल टोमणा एका युजरने तिला मारलेला आहे.

Kranti Redkar Video
Sonu Sood Whats Up Get Blocked : अभिनेता सोनू सूदचं व्हॉट्सॲप ब्लॉक; नेमकं कारण काय ?

क्रांती रेडकरच्या कामाबद्दल बोलायचे तर, क्रांती रेडकर दिग्दर्शित ‘रेनबो’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हितेन पटेल, ऋषी सक्सेना, ऊर्मिला कोठारे, प्रसाद ओक अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहेत.

Kranti Redkar Video
Ranbir - Sai Photos Viral Ramayana Movie : ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवरील रणबीर कपूर आणि साई पल्लवीचा फोटो व्हायरल, लूक पाहून नेटकरी म्हणाले...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com