Shocking: कोल्हापूर हळहळलं! पोटच्या मुलासाठी २० वर्षे सोसल्या झळा, पण क्षणात सर्व संपलं; दुधाच्या पातेल्यात पडून चिमुरडीचा मृत्यू

Girl Dies After Falling Into Boiling Milk: उकळत्या दुधामध्ये पडून २ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली. स्वयंपाक घरात उकळलेल्या दुधाचे पातेले ठेवले होते त्यामध्ये ही मुलगी पडली.
Shocking: कोल्हापूर हळहळलं! पोटच्या मुलासाठी २० वर्षे सोसल्या झळा, पण क्षणात सर्व संपलं; दुधाच्या पातेल्यात पडून चिमुरडीचा मृत्यू
Girl Dies After Falling Into Boiling MilkSaam Tv
Published On

Summary -

  • कोल्हापूरच्या तेरवाड गावात उकळत्या दुधात पडून दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

  • ग्रामदैवताच्या यात्रेदरम्यान ही हृदयद्रावक घटना घडली

  • गंभीर जखमी झालेल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

  • लग्नानंतर २० वर्षांनी जन्मलेल्या मुलीचा असा अंत झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

कोल्हापूरमध्ये उकळत्या दुधामध्ये पडून २ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील तेरवाड गावातल्या पाटील मळ्यामध्ये ही घटना घडली. २४ फेब्रुवारी रोजी मंचरी ज्ञानेश्वर खोत ही मुलगी उकळत्या दुधाच्या पातेल्यामध्ये पडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मंचरीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंचरीची प्रकृती गंभीर होती. उपचारादरम्यान रविवारी तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तेरवाड गावात २३ फेब्रुवारीपासून ग्रामदैवत श्री मंगरायासिद्ध देवाची यात्रा सुरू होती. या यात्रेनिमित्त मंचरीची आई माहेरी आली होती. मंचरीला तिची आई दूधभात चारत होती. त्यावेळी मंचरीसाठी पाणी आणण्यासाठी तिची आई घरामध्ये गेली. मंचरी देखील आईच्या मागे पळत स्वयंपाक घरात आली. त्याचवेळी मंचरीचा तोल जातो आणि ती स्वयंपाक घरात ठेवलेल्या उकळत्या दुधाच्या पातेल्यात जाऊन पडते.

Shocking: कोल्हापूर हळहळलं! पोटच्या मुलासाठी २० वर्षे सोसल्या झळा, पण क्षणात सर्व संपलं; दुधाच्या पातेल्यात पडून चिमुरडीचा मृत्यू
Shocking : "...तो तुझा मामा आहे" शेजारच्या तरुणासोबत आईला नको त्या अवस्थेत पाहिलं; मुलीला मांडीवर बसवलं अन्...

मंचरीच्या आईने तिला लगेच पातेल्यातून बाजूला केले. या घटनेत मंचरी गंभीर जखमी झाली. कुटुंबीयांनी तिला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी हलवलं. मंचरीवर कोल्हापुरात प्राथमिक उपचार करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी तिला सांगलीला हलवण्यात आले. पण उपचारादरम्यान मंचरीने अखेरचा श्वास घेतला.

Shocking: कोल्हापूर हळहळलं! पोटच्या मुलासाठी २० वर्षे सोसल्या झळा, पण क्षणात सर्व संपलं; दुधाच्या पातेल्यात पडून चिमुरडीचा मृत्यू
Shocking : "ती नसताना मी जगून काय फायदा?" प्रेयसीचा अपघातात मृत्यू, प्रियकराने ४८ तासांत संपवलं स्वतःच जीवन

चिमुकल्या मंचरीच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेनंतरचा खोत कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. खोत दाम्पत्याला लग्नानंतर तब्बल २० वर्षांनी अपत्यप्राप्ती झाली होती. मुलगी झाल्यामुळे खोत दाम्पत्य आनंदी होते. मंचरीचा ते प्रचंड लाड करत होते. पण आपल्या सोन्यासारख्या लेकराचा असा अंत होईल आणि ते सोडून जाईल असं खोत दाम्पत्यांना स्वप्नातही वाटलं नसेल. मंचरीचा मृत्यू झाल्यापासून तिचे आई-वडील आणि नातेवाईकचे रडून रडून बेहाल झालेत. या घटनेनंतर तेरवाड आणि लाटवाडी परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Shocking: कोल्हापूर हळहळलं! पोटच्या मुलासाठी २० वर्षे सोसल्या झळा, पण क्षणात सर्व संपलं; दुधाच्या पातेल्यात पडून चिमुरडीचा मृत्यू
Shocking : सेक्स रॅकेट चालवणाऱ्या अभिनेत्रीला ठाण्यात अटक, ज्युनिअर कलाकारांना फसवायची अन्..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com