Solapur: माहेरी गेलेल्या बायकोचा परत येण्यास नकार, व्हिडीओ बनवून तरुणाने आयुष्य संपवलं; सोलापुरमध्ये खळबळ

Solapur Husband End life: सोलापुरमध्ये एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. माहेरी गेलेली बायको परत येत नसल्यामुळे या तरुणाने टोकाचे पाऊल उचलले. राहत्या घरी गळफास घेत त्याने आयुष्य संपवलं.
Solapur: माहेरी गेलेल्या बायकोचा परत येण्यास नकार, व्हिडीओ बनवून तरुणाने आयुष्य संपवलं; सोलापुरमध्ये खळबळ
Solapur NewsSaam Tv
Published On

Summary -

  • माहेरी गेलेल्या बायकोने परत येण्यास नकार दिला

  • चिंतेत आलेल्या तरुणाची केली आत्महत्या

  • आत्महत्येपूर्वी तरुणाने भावनिक व्हिडीओ तयार केला

  • वर्षभरापूर्वी तरुणाने केला होता प्रेमविवाह

विश्वभूषण लिमये, सोलापूर

सोलापुरमध्ये एका तरुणाने माहेरी गेलेल्या बायकोने परत येण्यास नकार दिल्यामुळे आयुष्य संपवलं. सोलापुरातील तळे हिप्परगा गावामध्ये ही घटना घडली. माहेरी गेलेली बायको घरी परत येत नसल्यामुळे या तरुणाने राहत्या घरी गळफास घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने शेवटचा व्हिडीओ तयार केला आणि बायकोच्या साडीने गळफास घेत आयुष्य संपवलं. या घटनेमुळे सोलापुरमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम अंकुश जाधव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव होते. प्रेमने वर्षभरापूर्वी प्रेमविवाह केला होता. बाळंतपणासाठी त्याची बायको माहेरी गेली होती. त्याला मुलगी देखील झाली. मुलगी होऊन दोन महिने होत आले तरी देखील बायको माहेरावरून परत येत नाही त्यामुळे प्रेम चिंतेत होता. तो बायकोला सासरी परत येण्यासाठी विनंती करत होता पण ती ऐकत नव्हती यावरून त्यांच्यात वाद होत होते. सोलापुरात शिमगा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या सणासाठी तो बायकोला बोलवत होता, अशी माहिती नातेवाइकांनी दिली.

Solapur: माहेरी गेलेल्या बायकोचा परत येण्यास नकार, व्हिडीओ बनवून तरुणाने आयुष्य संपवलं; सोलापुरमध्ये खळबळ
Solapur Accident : सोलापुरात भयंकर अपघात, कॉलेजच्या ३ मित्रांचा जागीच मृत्यू

बायको सासरी येण्यास नकार देत असल्यामुळे चिंतेत येऊन प्रेमने टोकाचे पाऊल उचलले. त्याने रविवारी मध्यरात्री राहत्या घरी आत्महत्या केली. त्याने राहत्या घरामध्ये साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी प्रेमने शेवटचा व्हिडीओ तयार केला होता. या व्हिडीओमध्ये तो माझ्या मुलीची काळजी घे असं म्हणत मुलीला किस करताना दिसत आहे. बायको ऐकत नसल्यामुळे त्याने आत्महत्या केली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. प्रेमच्या आईचा तो लहान असतानाच मृत्यू झाला होता. त्याचा सांभाळ आजीने केला होता. त्याच्या पश्चात आजी, भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे.

Solapur: माहेरी गेलेल्या बायकोचा परत येण्यास नकार, व्हिडीओ बनवून तरुणाने आयुष्य संपवलं; सोलापुरमध्ये खळबळ
Solapur Highway: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! या राष्ट्रीय महामार्गाचा विस्तार होणार; ३५३ कोटींचा निधी मंजूर

रविवारी मध्यरात्री घराच्या दुसऱ्या खोलीतून मोठा आवाज झाला त्यामुळे प्रेमचा भाऊ पळत गेला. त्याने गळफास घेतलेल्या प्रेमला तात्काळ पकडून खाली उतरवले. शेजारच्यांच्या मदतीने त्याने साडी कापली आणि प्रेमला शासकीय रुग्णालयात नेले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Solapur: माहेरी गेलेल्या बायकोचा परत येण्यास नकार, व्हिडीओ बनवून तरुणाने आयुष्य संपवलं; सोलापुरमध्ये खळबळ
Solapur Crime : "जीव होता तो माझा..." विवाहितेने आयुष्याचा दोर कापला, हातावर मन सुन्न करणारा मजकूर अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com