३ मुलांना विष पाजले, बायकोचा गळा चिरला आणि स्वत:ला गळफास लावला, कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; टोकाचे पाऊल का उचलले?

Uttar Pradesh mass suicide investigation : उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये एका कुटुंबातील पाच जण मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. आर्थिक अडचणी हे कारण असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून तपास सुरू आहे.
Uttar Pradesh crime news
Uttar Pradesh crime news
Published On

Uttar Pradesh crime news : उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात शनिवारी एक धक्कादायक घटना घडली. एका बंद घरात एका जोडप्याचे आणि तीन मुलांचे मृतदेह आढळले. या घटनेमागील आर्थिक अडचणी हे कारण असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. घर ३ दिवसांपासून बंद होते, पोलिसांनी जेव्हा दरवाजा तोडला त्यावेळी त्यांना ३ मुलांचे आणि महिलेचा मृतदेह जमिनीवर पडलेला आढळला. तर व्यक्ती फाशीला लटकलेला दिसला.

डीआयजी प्रभाकर चौधरी म्हणाले की, वेल्डर म्हणून काम करणाऱ्या सत्यवीरने प्रथम आपल्या तीन मुलांना विष देऊन मारले. त्यानंतर चाकूने पत्नीचा गळा चिरला. त्यानंतर सत्यवीने गळफास लावून आयुष्याचा शेवट केला. या घटनेनंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. सामूहिक आत्महत्याची घटना समोर येताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. वेल्डर म्हणून काम करणारा ५० वर्षीय सत्यवीर कुटुंबासह अमनपूरमधील गुप्ता पेट्रोल पंपाजवळील घरात राहत होता. सत्यवीर मागील ८ ते १० वर्षांपासून आर्थिक अडचणींचा सामना करत होता.

Uttar Pradesh crime news
Crime : राक्षस सासरा! सेक्ससाठी नकार देणार्‍या सुनेची हत्या, काळ्या कृत्यात नवऱ्याची साथ

५० वर्षाच्या सत्यवीर याने ४८ वर्षाची पत्नी शीला हिचा गळा चिरून खून केला. आकांक्षा (१०), प्राची (१२) आणि मुलगा गिरीश (८) या ३ मुलींना विषारी पदार्थ खायला दिले. मुली अन् बायकोचा जीव घेतल्यानंतर सत्यवीर याने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे प्रभाकर चौधरी यांनी सांगितले. सामूहिक आत्महत्याची घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, सत्यवान मागील काही दिवसांपासून आर्थिक तंगीत होता.

Uttar Pradesh crime news
Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त, प्रति तोळा इतकी झाली किंमत, वाचा 22k, 22k गोल्डचे ताजे दर

गिरीश हा मागील अनेक दिवसांपासून आजारी होता. मुलाच्या आजारपणासाठी सत्यवान याने अनेकांकडून उधार पैसे घेतले होते. पण ते परत देता येत नव्हते. स्टोव्ह, खोली आणि आजूबाजूच्या परिसराची स्थिती पाहता, आर्थिक अडचणी हे या घटनेचे मुख्य कारण असल्याचे दिसून येते. घटनेची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी प्रणय सिंह, पोलिस अधीक्षक अंकिता शर्मा आणि भाजप आमदार हरिओम वर्मा देखील तेथे पोहोचले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले असून पुढील तपास सुरू केला आहे.

Uttar Pradesh crime news
Filmmaker Death : प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचं निधन, घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, बॉलिवूडवर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com