Crime rate in Uttar Pradesh : माणुसकीला लाजवणारी एक भीषण घटना उत्तर प्रदेशमधून समोर आली आहे. शरीरसंबंधांच्या मागणीला नकार दिल्याने बापासमान सासर्याने सुनेची निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे या हत्येमध्ये सासर्याला स्वतःच्या मुलाने म्हणजेच पीडितेच्या पतीनेही साथ दिली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. राक्षस सासरा आणि नराधम नवरा दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अब्बास उर्फ बासा असे आरोपीचे नाव आहे.
उत्तर प्रदेशमधील शामलीतील कैराना येथे नात्याला काळिमा फासणारी ही क्रूर घटना घडली आहे. वासनांध सासऱ्याची सूनेवर वाईट नजर होती. त्याने सूनेकडे शरीरसंबंधाची मागणी केली. पण सूनेकडून स्पष्ट नकार देण्यात आला, त्यावेळी संतापलेल्या सासऱ्याने सूनेची हत्या केली. या काळ्या कृत्यामध्ये नवऱ्यानेही साथ दिली. आयुष्यभर रक्षण करण्याची शपथ घेणारा नवऱ्यानेही या कृत्यात साथ दिली. ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर शामलीतील प्रत्येकाचा संताप अनावर झाला होता.
आठ दिवसांपूर्वी शामली जिल्ह्यातील कैराना परिसरातील खुरगन गावात एका महिलेचा मृतदेह घरी खाटेवर पडलेला आढळला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रूग्णालयात पाठवला. संशायास्पद मृत्यूची नोंद करत पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला. त्यानंतर धक्कादायक वास्तव समोर आले.
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये महिलेची गळा दाबून हत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला अन् कुटुंबातील आणि शेजाऱ्यांचे जबाब घेतले. पोलिसांच्या तपासात या महिलेची हत्या सासऱ्यानेच केल्याचे उघड झाले. पोलिसांनी तात्काळ अब्बास उर्फ बासा याला अटक केली. त्याने मुलाची बायको मशकुरा हिची हत्या केल्याचे उघड झाले. तर मुलाने हत्येचे पुरावे लपवण्यात आणि नष्ट करण्यात मदत केली होती. पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी अब्बास याला खाकी दाखवत कसून चौकशी केली, त्यावेळी तो सर्वकाही बोलला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अब्बास सुनेशी लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत होता. पण नकार दिल्याने गळा दाबून तिची हत्या केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.