Pune : बांगलादेशातून थेट बुधवार पेठेत आणायचा महिला; कोण आहे पाचवी पास 'बाबू भैया'?

Pune Trafficking Case : पुण्यातील बुधवार पेठेत बांगलादेशी महिलांना जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या कथित रॅकेटचा पर्दाफाश झाला. “बाबू भैया” उर्फ पापा शेखसह अनेक आरोपींवर गुन्हा दाखल असून पोलिसांचा तपास सुरू आहे.
Pune Trafficking Case
Pune Trafficking CaseSaam TV Marathi
Published On

Pune Budhwar Peth trafficking case details : बांगलादेशी महिलांना पुण्यात आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या "बाबू भैया" वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बुधवार पेठेत झालेल्या कारवाईनंतर हा बाबू भैया उर्फ पापा शेख याचे नाव समोर आले आहे. बांगलादेशच्या सीमेवर बोगस आधार कार्ड तयार करून देणाऱ्या दलालांच्या संपर्कात हा बाबू होता. काही दिवसांपूर्वी पुण्यातील बुधवार पेठेत ११ बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. फरासखाना पोलिस ठाण्यात या बाबू भैया उर्फ पापा शेख याच्या विरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Babu Bhaiya Papa Sheikh police case)

याप्रकरणी पापा शेख यासह सुमित्रा कांबळे, राजेश कलीमनी, रणजीत पात्रा, रूपा शेख यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही सगळी टोळी हे रॅकेट चालवत होते असे तपासातून निष्पन्न झालं आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील बुधवार पेठेत पुणे पोलिसांनी कारवाई केली. यावेळी २२ महिलांना ताब्यात घेतले असता त्यातील ११ जणी या बांगलादेशी असल्याचं तपासातून समोर आलं. या ११ महिला बोगस आधार कार्ड आणि इतर कागदपत्र बाळगत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात राहून वेश्याव्यवसाय करत होत्या.

Pune Trafficking Case
Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त, प्रति तोळा इतकी झाली किंमत, वाचा 22k, 22k गोल्डचे ताजे दर

या आरोपींनी या महिलांना ब्युटी पार्लर तसेच शिलाईकाम मिळवुन देतो, असे खोटे आश्वासन देत, त्यांच्याकडू जबरदस्तीने तसेच पैशाचे आमिष दाखवून, वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करत होता. त्यांना कुंटनखान्यात ठेऊन, त्यांच्या वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या कमाईतील रक्कम स्वतःकडे ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पोलिसांकडून या महिलांना आता बांगलादेशला पाठवलं जाणार असून या सगळ्या दलालांची कसून चौकशी सुरू आहे.

Pune Trafficking Case
Crime : लेकीचा मृतदेह गादीत गुंडाळला अन् कारमधून निघाले; पण 'त्या' एका संशयाने सगळा डाव उधळला!

कोण आहे हा बाबू भैया उर्फ पापा शेख?

बाबू भैया उर्फ पापा शेख हा गेल्या २० वर्षांपूर्वी पुण्यातील बुधवार पेठ या ठिकाणी असणाऱ्या एका हॉटेलमध्ये छोट मोठं काम करत होता. हळूहळू त्याने तिथे असलेला वेश्य व्यवसाय कसा चालतो हे माहिती करून घेतलं आणि त्यातले अनेक बारकावे सुद्धा समजून घेतले. कालांतराने त्याने बांगलादेश मधून येणाऱ्या अल्पवयीन तरुणींना कोलकत्ता मार्गे पुण्यात आणायला सुरुवात केली आणि त्यातून त्याने पैसा कमवायला सुरुवात केली. बाबू भैयाचं शिक्षण फक्त पाचवीपर्यंत झाले आहे.

बाबू भैया चे तीन विवाह झाली आहेत आणि त्याची एक पत्नी बांगलादेशी आहे. त्याच्या तिन्ही पत्नी सध्या बुधवार पेठेत मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेतात. बाबू भैया च्या तिन्ही पत्नी यांचं बुधवार पेठेतील एका भागात वर्चस्व असल्यामुळे त्यांच्या इथून सुटका करून बाहेर पडणे हे अनेक महिलांना जमत नाही. एखाद्या महिलेने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर तिला या बाबूच्या पत्नीकडून मारहाण होत असे. अशाच एका गुन्ह्यात बाबू वर पोलिसात गुन्हा दाखल असून तो फरार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून बुधवार पेठेत वास्तव असलेल्या बाबू भैयाचे पोलिसांसोबत चांगलं सूत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याचे याच भागात दोन छोटे हॉटेल, ३ बिल्डिंग असून त्यातील एक अनधिकृत आहे.

Pune Trafficking Case
Filmmaker Death : प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचं निधन, घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, बॉलिवूडवर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com