Filmmaker Death : प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचं निधन, घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, बॉलिवूडवर शोककळा

Filmmaker M.M. Baig Dies at 70: प्रसिद्ध चित्रपट निर्माते एम.एम. बेग यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. अनेक दिवस घरात एकटे राहत असताना त्यांचा मृतदेह आढळल्याने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
M M Baig death news details
Late filmmaker M. M. Baig, known for his work in several 80s and 90s Hindi films, passes away at 70.
Published On

Filmmaker M.M. Baig Passed Away : भारतीय चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत धक्कादायक अन् दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते एम.एम. बेग (वय ७०) यांचे निधन झाले आहे. त्यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे. घरातून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली होती, त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याचे समजतेय.

प्रसिद्ध चित्रपट निर्माते एम.एम. बेग यांना बेबी गुड्डूचे वडील म्हणून इंडस्ट्रीमध्ये ओळखले जात होते. गेल्या काही वर्षांपासून बेग हे चित्रपटश्रृष्टीपासून दूर होते. ते काही दिवसांपूर्वी घरात मृतावस्थेत आढळले. हनीफ झवेरी यांनी बेग त्यांच्या मृत्यूची बातमी दिली. त्यांनी सांगितले की, बेग बऱ्याच काळापासून आजारी होते आणि एकटे राहत होते. मागील ५ ते ६ दिवसांपासून घराबाहेर पडले नव्हते. घरातून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी दार उघडले तेव्हा त्यांना बेग हे आतमध्ये मृतावस्थेत आढळले. त्यांच्या मुलीला याची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी बेगचा मृतदेह पहाटे १:३० ते २:०० च्या दरम्यान शवविच्छेदनासाठी कपूर रुग्णालयात पाठवला.

M M Baig death news details
ज्येष्ठ खासदाराचे दुर्दैवी निधन, फुटबॉल खेळताना मैदानातच कोसळले, देशावर शोककळा!

कोण होते एम.एम. बेग?

एम.एम. बेग यांनी चित्रपटसृष्टीत बराच काळ काम केले. बेग हे शांत स्वभावासाठी आणि त्यांच्या कामासाठी ओळखले जातात. त्यांची मुलगी, बेबी गुड्डू, ८० आणि ९० च्या दशकात बालकलाकार म्हणून काम करत होती. बेग यांनी ८० आणि ९० च्या दशकात असंख्य चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. चित्रपटातील करिअरच्या सुरुवातीला बेग यांनी जे. ओम प्रकाश, विमल कुमार आणि राकेश रोशन यांच्यासह अनेक प्रमुख चित्रपट निर्मात्यांसोबत काम केले. दिवंगत बेग यांनी ८० आणि ९० च्या दशकात अनेक व्यावसायिक चित्रपटांमध्येही काम केले. आदमी खिलोना है, जैसी करनी वैसी भरनी, कर्ज छकना है, काला बाजार आणि किशन कन्हैया या चित्रपटात बेग यांनी काम केलेय.

M M Baig death news details
Pune Police : पुणे पोलीस दलात मोठी कारवाई, एकाच वेळी तब्बल ३२ पोलिसांची बदली, कारणं आले समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com