Pune Police : पुणे पोलीस दलात मोठी कारवाई, एकाच वेळी तब्बल ३२ पोलिसांची बदली, कारणं आले समोर

32 police transferred from Loni Kalbhor : पुणे पोलीस दलात मोठी प्रशासकीय कारवाई. लोणी काळभोर पोलीस ठाणे येथील ३२ कर्मचाऱ्यांची बदली. अमितेश कुमार यांनी आदेश जारी केल्यानंतर पोलिस वर्तुळात चर्चा.
32 police transferred from Loni Kalbhor
32 police transferred from Loni KalbhorSaam TV Marathi News
Published On

32 police transferred from Loni Kalbhor : पुणे पोलिस दलात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आयुक्तांनी केली आहे. पुण्यातील लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील तब्बल ३२ कर्मचाऱ्यांची एकाच वेळी बदली करण्यात आली आहे. कार्यकाळ संपवून सुद्धा तिथेच कार्यरत राहणारे, पोलिस ठाण्याच्या जवळ राहणारे, तसेच कर्तव्यात कमी पडलेले कर्मचारी यांच्यावर "बदलीचा बॉम्ब पडला आहे. ३२ कर्मचाऱ्यांची पुण्यातील विमानतळ, सिंहगड रोड पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश आज जारी केले.

एकाच पोलिस ठाण्यातून एकाच वेळी ३२ कर्मचाऱ्यांच्या बदलीमुळे पुणे शहर पोलिस दलात मोठी चर्चा सुरू. झाली आहे. ३ सहायक पोलिस फौजदार, १० पोलीस हवालदार आणि १९ पोलीस अंमलदार यांच्या बदलीमध्ये समावेश आहे. आदेशाप्रमाणे या बदल्या प्रशासकीय कारणामुळे जरी झाल्या असल्या तरी सुद्धा या निर्णयामागे काही इतर आणि तेवढीच महत्त्वाची कारणं आहेत का? अशी चर्चा पोलिस दलात सुरू झाल्या आहेत.

32 police transferred from Loni Kalbhor
Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलिस ठाणे हे पूर्वी पुणे ग्रामीण पोलिस यांच्या आख्यारीत येत होतं. ५ वर्षांपूर्वी ते पुणे शहर आयुक्तालय यांच्या हद्दीत आलं मात्र तेव्हापासून या ठिकाणच्या अनेक कर्मचाऱ्यांची बदली झालेली नाही. इतकचं काय तर असे काही कर्मचारी आहेत जे पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर राहतात. शहर आयुक्तालयात आल्यापासून या पोलिस ठाण्यातील अनेक कर्मचाऱ्यांच्या तिथून जवळ असलेल्या इतर पोलिस ठाण्यात सुद्धा करण्यात आल्या नव्हत्या.

32 police transferred from Loni Kalbhor
ATS ची राज्यात मोठी कारवाई! नवी दहशतवादी संघटना फोफावण्यापूर्वीच खेळ मोडला, उच्चशिक्षित तरुण होते निशाण्यावर

काही दिवसांपूर्वी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, परिमंडळ ६ चे पोलिस उपआयुक्त राजकुमार शिंदे यासह वरिष्ट अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर ही बाब समोर आली आणि अखेर हा निर्णय घेण्यात आला. लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील जुन्या कर्मचाऱ्यांच्या बदलीमुळे आता काही नवीन कर्मचारी तिथे आता कार्यरत होणार आहेत. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी नव्या ठिकाणी हजर झाल्याचा अनुपालन अहवाल कार्यालयात सादर करणे बंधनकारक असल्याचे आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

32 police transferred from Loni Kalbhor
मोठी बातमी!अंबानी पुन्हा ईडीच्या रडारवर! ४० हजार कोटींचा बँक घोटाळा; २६ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com