Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त, प्रति तोळा इतकी झाली किंमत, वाचा 22k, 22k गोल्डचे ताजे दर
Gold Silver Rate Today 20 Feb 2026 : सराफा बाजार उघडताच आज सोनं आणि चांदीच्या किंमतीमध्ये घसरण नोंदवण्यात आली. अमेरिका अन् इराण यांच्यातील सत्तासंघर्षाचा परिणाम जागतिक बाजारावर पडलाय. त्यामुळेच सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेकजण सोने खरेदीकडे वळले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या किंमतीमध्ये चढ उतार पाहायला मिळतोय. आज देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमतीत किंचित घसरण पाहायला मिळाली. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ३२० रूपयांनी कमी झाली आहे. प्रति तोळा सोन्याची किंमत 156320 रूपये इतकी झाली आहे. (24K Gold Drops by ₹320 per Tola)
आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धाची स्थिती अथवा दोन देशांमधील संघर्ष वाढतो, त्यावेळी शेअर बाजाराती अस्थिरताही वाढते. त्याचा परिणाम सोन्यावर होतो. कारण युद्धाची स्थिती अन् २ देशांमधील संघर्ष वाढल्यास गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोनं आणि चांदीच्या खरेदीचा पर्याय निवडतात. गेल्या अनेक वर्षांपासून सोन्यामध्ये सुरक्षित गुंतवणूक होतोच, त्याशिवाय मोठ्या प्रमाणात व्याज मिळते. पण अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील परिस्थिती बिघडली तर सोनं, चांदीसह धातूंच्या किंमतीमध्ये आणखी वाढ होऊ शकते. तुम्ही जर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारातील स्थिती पाहूनच निर्णय घ्या.
आज सोन्याची किंमत किती आहे ?
आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत किंचित घसरण पाहायला मिळाली. देशांतर्गत मार्केटमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १५६,३२० रुपये आहे. गुरूवारी ही किंमत १५६,६४० रुपये होती. २४ कॅरेट सोन्याची किंमत ३२० रूपयांनी घसरली आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ३०० रूपयांची घसरण दिसून आली. आज २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,४३,३०० रुपये इतकी नोंदवण्यात आली आहे. १८ कॅरेट सोन्याच्या किमतीमध्येही घसरण झाली आहे. सराफा बाजारात १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ₹११७,२८० आहे. गुरूवारच्या तुलनेत २४० रूपयांनी सोन्याची किंमत घसरली आहे. गुरूवारी सराफा बाजारात १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १० ग्रॅम ₹११७,५२० होती.
तुमच्या शहरात सोन्याची किंमत किती आहे ?
पुणे, मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर प्रति १० ग्रॅम १५६,१७० रुपये इतका आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १४३,१५० रुपये आहे. जयपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा १५६,३२० रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १४३,३०० रुपये आहे. लखनऊमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १५६,३२० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १४३,३०० रुपये आहे. राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १५६,३२० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १४३,३०० रुपये आहे. कोलकातामध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १५६,१७० रुपये आहे आणि २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १४३,१५० रुपये आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

